पुणे : साई उत्सवानिमित्त सातारा रस्त्यावरील शंकरमहाराज मठात साईंच्या पादुकांचे आगमन झाले. यंदाचा उत्सव दशकपूर्ती असून, त्याचे उद्घाटन ससून रुग्णालयात २५ वर्षांपेक्षा अधिक काळ रुग्णसेवा केलेल्या १० परिचारिकांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक विशाल तांबे, नगरसेविका मोहिनी देवकर आदी उपस्थित होते.आजवरची रुग्णसेवा आम्ही साईचरणी अर्पण करतो, असे उद्गार परिचारिका विजया गपाट यांनी व्यक्त केले. साईस्नेह संस्थेतर्फे ‘अभिमान कतृत्वाचा- गौरव इतिहासाचा’ या उपक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी सुप्रिया साठे यांचे प्रवचन झाले. ज्ञानेश्वर दारवटकर व निर्मल पार्क विणकर सोसायटीने संयोजन केले.
धनकवडीत साई उत्सवाचा आनंद सोहळा
By admin | Updated: January 20, 2015 00:55 IST