शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमनोरामध्ये इंजिनियर्सचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 06:59 IST

या तरुणांचा धिंगाणा सहन न झाल्याने नागरिकांनी पोलिसांना कळविले़ त्यांना शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली़

पुणे : हडपसर येथील अ‍ॅमनोरा व्हीक्ट्री टॉवर येथे शनिवारी मध्यरात्री दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या ६ आयटी इंजिनिअर्सना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे़ या तरुणांचा धिंगाणा सहन न झाल्याने नागरिकांनी पोलिसांना कळविले़ त्यांना शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली़अभिषेक जेमिनी (वय २४), चंदन दीपक भंडारी (वय २४), अमनदीप शर्मा (वय २७), उत्कर्ष महावीर शर्मा (वय २४), रोहित हिरालाल वांगणू (वय ३०, सर्व रा. अ‍ॅमनोरा), राकेश शंभूदयाल शर्मा (वय २८, रा. वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ पोलीस शिपाई एच. एम. दूधभाते यांनी फिर्याद दिली आहे.अ‍ॅमनोरा व्हीक्ट्री टॉवरमधील २०२ क्रमांकाच्या इमारतीमध्ये रोहित वांगणू याचा फ्लॅट आहे. तो आणि त्याच ५ मित्र आयटी इंजिनियर आहेत. शनिवारी रात्री पार्टी करण्यासाठी हे सर्व जण वांगणुच्या घरी आले. पार्टी सुरू झाल्यानंतर दारू पिऊन धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने वैतागलेल्या रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून याची तक्रार केली. त्यामुळे पोलीस शिपाई दूधभाते आणि त्यांचे सहकारी मार्शल सोसायटीमध्ये गेले. त्यांनी या तळीरामांना शांत होण्यास सांगितले असता, त्यांनी तुम्ही आम्हाला शांत करणारे कोण, असे म्हणत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या दोन्ही पोलिसांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला. त्यावेळी या पोलिसांनी पोलीस ठाण्यात फोन करून वरिष्ठांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस ठाण्यातून आणखी काही पोलीस सोसायटीमध्ये आले. या सर्वांना ताब्यात घेऊन सरकारी कामात अडथळा आणणे, दंगा करणे आणि मुंबई दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे़

टॅग्स :Puneपुणे