लोणावळा, दि. 1- पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसमधून पडून एका युवा अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खंडाळा घाटातील मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान सोमवारी रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली. तुषार संजय चिंचवले (वय २८, रा. स्नेहल बिल्डिंग, नूतन मराठा कॉलेज जवळ, प्रतापनगर, जळगाव, सध्या पुणे) असं मृत्यू झालेल्या अभियंत्याचं नाव आहे. लोणावळा लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईकडे जाणारी इंटरसिटी खंडाळा घाटातून जात असताना मंकी हिलजवळ तुषार हा चालत्या गाडीतून खाली पडला. तो कामानिमित्त ठाण्याला निघाला होता. त्याच्या बँगमधील ओळखपत्रावरुन त्याच्या ओळख पटविण्यात आली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम.एम.पठाण हे करत आहेत.
इंटरसिटी एक्सप्रेसमधून पडून अभियंत्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 12:50 IST
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसमधून पडून एका युवा अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
इंटरसिटी एक्सप्रेसमधून पडून अभियंत्याचा मृत्यू
ठळक मुद्दे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसमधून पडून एका युवा अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.खंडाळा घाटातील मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान सोमवारी रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली. पुण्याहून मुंबईकडे जाणारी इंटरसिटी खंडाळा घाटातून जात असताना मंकी हिलजवळ तुषार हा चालत्या गाडीतून खाली पडला.