आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे ही खोरी व हा परिसर भातशेतीची आगार समजली जातात. पुणे जिल्ह्यातील एकुण भातक्षेञ ६३,८०० हेक्टर क्षेञापैकी ५१०० हेक्टर क्षेञावर आंबेगाव तालुक्यात भात लागवड केली जाते. गतवर्षा पेक्षा चालु वर्षी केवळ पावसाच्या पाण्यावरती अवलंबुन असणार्या भातशेतीला शेवट पर्यंत पाऊस न मिळाल्यामुळे भात क्षेञाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने भात पिकाचे उत्पादन कमी झाले. त्यानंतर मुळसधार पाऊस, दाट धुके आणि रोगट वातावरणाचा फटकाही बसला भात पिकांवर करपा तांबेरा व खोड किडा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. या रोगांचा आदिवासी शेतकरी सामना करतोना करतो तोच शेवटच्या परतीच्या पावसाने या भागामध्ये थैमान घातल्याने आदिवासी बांधवांनी या निसर्गापुढे अक्षश: गुढगे टेकले. कसे बसे राहीलेले पिक आपल्या हाती लागेल या हेतुने आदिवासी बांधवांनी भात या पिकाची काढण्या करुन झोडण्या उरकल्या परंतु हाती आले मोठ्या प्रमाणात पळंज व पाकुड. सध्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये भात झोडणीची कामे संपल्या असुन सावा वरई नाचणी या बारीक धान्यांच्या मळण्या सुरु आहेत व भात शिवारे थंडावली आहेत.
कामे संपल्याने भात शिवारे थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:04 IST