शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: April 25, 2017 03:54 IST

पुणे-नगर रोडवरील वाहतूककोंडीला अडसर ठरणारी अतिक्रमणे नेमकी कोणी काढायची, याबद्दल सर्वच सावध भूमिका घेत आहेत.

शिक्रापूर : पुणे-नगर रोडवरील वाहतूककोंडीला अडसर ठरणारी अतिक्रमणे नेमकी कोणी काढायची, याबद्दल सर्वच सावध भूमिका घेत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस कार्यवाही करून रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे काढण्याची मागणी वाहतूककोंडीला दररोज सामोरे जाणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण चौक व पाबळ चौक या ठिकाणी वाहतूककोंडीला आळा घालण्यासाठी येथील सर्व अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काही दिवसांपूर्वी हटविण्यात आली होती. त्यानंतर येथील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी झाली.परंतु, अलीकडील काळात पुणे-नगर रस्त्यावर शिक्रापूर, कोरेगाव भीमा, सणसवाडी, रांजणगाव अशा अनेक ठिकाणी अतिक्रमणे उभी राहत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. या भागात एक अतिक्रमण झाल्यानंतर शेजारीदेखील राजरोसपणे अतिक्रमण उभे राहते. त्यामुळे येथे अतिक्रमण करणाऱ्यांना कसलेही भय राहिले नसल्याचे दिसते. तर, येथील रस्त्याच्या कडेला अतिक्रमण झाल्यामुळे येथे उभ्या राहणाऱ्या वाहनांना भररस्त्यात उभे राहावे लागत असून, त्यामुळे नागरिकांनादेखील पूर्ण रस्त्यावर उभे राहावे लागते. (वार्ताहर)