शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरणाच्या भूखंडांना अतिक्रमणाचा विळखा, प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 00:47 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे शहरातील राखीव भूखंडावर दिवसेंदिवस होणाऱ्या अतिक्रमणावर वारंवार कारवाई केली जाते.

रहाटणी : पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे शहरातील राखीव भूखंडावर दिवसेंदिवस होणाऱ्या अतिक्रमणावर वारंवार कारवाई केली जाते. मात्र कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारची दक्षता घेत नसल्याचे दिसून येत आहे. नवनगर विकास प्राधिकरणाने अनेक भूखंडांवरील अतिक्रमणे काढून टाकली आहेत. मात्र त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या राखीव भूखंडावर पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा निर्माण झालेला आहे. रोज होणाºया अतिक्रमणाला जबाबदार कोण, असा प्रश्न शहरवासीय विचारू लागले आहेत.शहरातील काळेवाडी, रहाटणी, थेरगाव भागातील अनेक ठिकाणच्या प्राधिकरणाच्या राखीव जागेवर अनेक प्रकारचे अतिक्रमण करून भूखंड ताब्यात घेतल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे, अशा भूखंडावरील अतिक्रमण काढण्याचे काम अनेक वेळा प्राधिकरणाकडून करण्यात आलेले आहे. तरीही पुन: पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होते कसे हा एक संशोधनाचा विषय आहे. अतिक्रमण कारवाई केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होते. याकडे संबंधित प्रशासन लक्ष देत नाही व तक्रारी वाढू लागल्या, की पुन्हा फक्त कारवाई केल्याचे दिसून येते.थेरगाव हद्दीतील एमएम शाळेशेजारी मागील अनेकवर्षांपासून प्राधिकरणाच्या जागेवर अनेक भंगारवाले आपले दुकानथाटले आहे त्या ठिकाणी शेकडो टन कचरा गोळा करून त्या कचºयाचे वर्गीकरण करून त्या ठिकाणाहून विक्री केली जाते. मात्र या ठिकाणी अनेक वेळा कारवाई करून ही दुकाने हटवण्यात आली. मात्र, पुन्हा या ठिकाणी अनेक दुकाने थाटलेली दिसून येत आहेत.या भंगार व्यावसायिकांनी बाजारात न विकणारा माल पवना नदीपात्रामध्ये टाकून नदीदेखील प्रदूषित केल्याचे दिसून येत आहे. हे होत असताना महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग, आरोग्य विभाग व प्राधिकरणाचे प्रशासन निव्वळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वाढत्या अतिक्रमणाला महापालिका प्रशासन व प्राधिकरण प्रशासन कधी आळा घालणार, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित करण्यात येत आहे.एखाद्या वेळेस मोठ्या प्रमाणात हवा सुटली, की या ठिकाणचा सर्व कचरा मुख्य रस्त्यावर येतो. त्यामुळे परिसर कितीही स्वच्छ केला, तरी परिसरात स्वच्छता दिसून येत नाही. त्यामुळे चांगले काम करणाºया आरोग्य विभागावरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या भागातील अनधिकृत असलेले हे भंगाराचे दुकान हटवण्याची मागणी परिसरातील रहिवासी करू लागले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड