शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणगावला ५६ एकरांवरील अतिक्रमण हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:56 IST

वनजमिनींनी घेतला मोकळा श्वास : ४० जणांवर अधिकाऱ्यांनी केला गुन्हा दाखल

काटी : इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील फॉरेस्ट गट नं. २७, २०८ या ५६ एकर वनजमिनीवरील अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई करण्यात आली. वन खात्याने धडक मोहीम राबवून ४० जणांवर वनजमिनीवर अतिक्रमण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून ५६ एकर वनजमीन ताब्यात घेतली आहे.

सहायक वनसंरक्षक मधुकर तेलंग, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी १४० वनकर्मचारी व राज्य राखीव दलाची पोलीस तुकडी क्र. ११ यांनी धडक मोहीम राबवली. हिंगणगाव येथील फॉरेस्ट गटाचे सर्वेक्षण व सीमांकन पुणे वन विभागाचे वन सर्वेक्षकअधिकारी जाधव व त्यांचे सहकारी यांनी केले. त्यानंतर सुमारे ४० जणांनी सुमारे ५६ एकर क्षेत्रावर शेतीचे, गोठ्याचे व इतर अतिक्रमण केल्याचे वन विभागाला आढळून आले होते. त्यानंतर वन विभागाने भारतीय वन अधिनियम १९२७च्या वन कायद्यानुसार व इतर तरतुदीनुसार संबंधित इसमांवर गुन्हा नोंदविला आहे. वन गुन्ह्याची नोंद इंदापूर न्यायालयात नोंदवली आहे. संबंधितांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन कर्मचाºयांनी अतिक्रमण हटविण्याबाबत समज दिली होती. त्यानंतर काही लोकांनी अतिक्रमण हटवले; परंतु राहिलेलेअतिक्रमण १४० वन विभागाच्या ताफ्याने हटवले.  त्यामुळे इंदापूर तालुक्यातील वनजमिनीने मोकळा श्वास घेतला आहे. या कारवाईसाठी सहायक वनसंरक्षक तेलंग, वनपरिक्षेत्र अधिकारी काळे यांच्यासह महादेव हजारे दोड, गोरीशंकर सुपेकर, बारामती, प्रकाश चौधरी, राज्य राखीव दलाची पोलीस तुकडी क्र. ११ तसेच बारामती, दौंड, हवेली, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, भोर, मावळ इत्यादीवनसंरक्षक वनपाल कर्मचारी उपस्थित होते. विवेक खांडेकर प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक विवेक खांडेकर, उपवनसंरक्षक लक्ष्मी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे. जून २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत अतिक्रमण हटवलेल्या वनजमिनीवर झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जून २०१७ पासून शेटफळ गढे, न्हावी, शेळगाव, डाळज १, २, गागरगाव, बिजवडी कर्मयोगी कारखान्याच्या परिसरातील अतिक्रमण वनक्षेत्रावर कारवाई करून २३९ एकर वनजमिनी वन विभागाने ताब्यात घेतल्या आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी काळे यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणे