शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
5
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
8
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
9
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
10
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
11
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
12
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
13
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
14
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
15
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
16
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
17
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
18
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
19
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
20
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार

शहरात बकरी ईद उत्साहात

By admin | Updated: September 14, 2016 00:37 IST

पिंपरी-चिंचवड शहरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात नमाज अदा करून व कुर्बानी देऊन मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी केली.

नेहरूनगर : पिंपरी-चिंचवड शहरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात नमाज अदा करून व कुर्बानी देऊन मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी केली.पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, कुदळवाडी, काळेवाडी, नेहरूनगर, मोरवाडी, खराळवाडी आदी परिसरातील मस्जिद व ईदगाह मैदानावरती सकाळी नऊच्या सुमारास हजारो मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची ईद-उल-अज्हा नमाज अदा केली. नमाजपठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’ म्हणत गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. ईदनिमित्त बकऱ्याची कुर्बानी देऊन मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मेजवानी देऊन उत्साहात बकरी ईद साजरी केली.पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वांत मोठ्या असलेल्या येथील ईदगाह मैदानावर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास मुफ्ती गुलाम मुस्तफा व मौलाना आजाद यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईद व कुर्बानीचे महत्त्व सांगून नमाजाचे पठण केले. नेहरूनगर, संत तुकारामनगर, वल्लभनगर, मासूळकर कॉलनी, मोरवाडी, बालाजीनगर, यशवंतनगर, महात्मा फुलेनगर, गवळीमाथा आदी परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे बकरी ईदची ईद-उल-अज्हा ही नमाज अदा केली व अल्लाजवळ सर्व नागरिकांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना (दुवा) केली.कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड मुस्लिम वेल्फेअर अ‍ॅण्ड कब्रस्थान ईदगाह कमिटीचे अध्यक्ष ए. बी. शेख, फारूख इनामदार, जिलानी मुलानी, नादिर शेख, कादर शेख, जिलाणी शेख, मीरा तराजगार आदींनी केले होते. या ठिकाणी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे, सहायक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, पोलीस उपनिरीक्षक भूषण पवार, पोलीस उपनिरीक्षक मुळे यांच्यासह विविध ठिकाणी ३५ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. तवकल्ला जामा मशिदीमध्ये सकाळी आठला मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची ईद-उल-अज्हा ही नमाज अदा केली. नमाजाचे पठण मौलाना अबुल कलाम यांनी करून बकरी ईद कुर्बानी विषयी माहिती सांगितली. नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे आयोजन तवकल्ला जामा मशिदीचे अध्यक्ष नजीर तराजगार, रशीद पीरजादे, शफीक शेख, बरकत अली शेख, मजीद दळवी, हारुण शेख, सलीम शेख आदींनी केले होते. कार्यक्रमासाठी मुनाफ तराजगार, इरफान देशनुर, जावेद पठाण, सलीम शेख, शाहीद सिद्दिकी, मोहतसिम दळवी, फारुख तराजगार आदींनी परिश्रम घेतले. सांगवीमध्ये ईद उत्साहातपिंपळे गुरव : नवी सांगवी येथे बकरी ईदनिमित्त मजूरवर्गाच्या मुलांना संस्कार प्रतिष्ठानाच्या वतीने जिलेबीचे वाटप करण्यात आले. साई मिनी मार्केटजवळील मजूर अड्ड्यावरील लहान मुलांना सतीश मदने व दत्तात्रय भोसले यांच्या वतीने जिलेबीचे वाटप झाले. या वेळी संजय मानमोडे, रमेश भोसले, रमेश काशिद, दीपक माकर आदी उपस्थित होते. दापोडी, सांगवी येथील मशिदीमध्ये बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. नमाज अदा झाल्यानंतर एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी बालकांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिखलीत नमाजपठणतळवडे : चिखली येथील शाही जामा मस्जिद या ऐतिहासिक मशिदीत पारंपरिक पद्धतीने नमाजपठण करून ईद साजरी झाली. नमाजपठण मौलाना अबरार अहमद यांनी केले. यानिमित्त मशिदीचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी माहिती दिली. सर्व जगात शांतता, बंधुता प्रस्तावित व्हावी आणि माणुसकी वाढीस लागावी यासाठी प्रार्थना केली. या वेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. निगडी स्टेशनचे पोलीस निरीक्षक वीरेंद्र चव्हाण आणि सहकारी यांनी या वेळी बंदोबस्त केला; तसेच मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.तळेगावला पोलिसांकडून शुभेच्छातळेगाव दाभाडे : बकरी ईद येथे भक्तिभावाने साजरी झाली. ईदगाहवर सुमारे तीन हजारांवर मुस्लिम आबालवृद्धांनी ईदची नमाज अदा केली. ईदगाह मैदानावर शहर आणि परिसरातील मुस्लिम बांधवांनी इमाम मौलाना सिकंदर ए आजम यांच्या आलीमागे नमाजपठण केले. ईदचे महत्त्व आणि परंपरांचा उल्लेख करत इमाम आजम यांनी कुर्बानीचा मथितार्थ सांगितला. त्यानंतर सद्बुद्धी, सन्मार्ग, मानवकल्याण, त्याग आणि समर्पणासाठी शक्ती द्यावी म्हणून अल्लाहजवळ दुवा करण्यात आली.पोलीस निरीक्षक वसंत बाबर, सहायक पोलीस निरीक्षक वायसिंग पाटील, गजानन जाधव, पोलीस निरीक्षक ए. एम. लांडगे व पोलीस जवानांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या वेळी रशीद सिकिलकर, बाबूलाल नालबंद अमीन खान, गनिमिया सिकिलकर आयुब सिकिलकर आदींनी स्वागत केले.प्रदीप नाईक यांच्यातर्फे गरीब, गरजू महिला व मुलांना पतंजली पौष्टिक पदार्थ व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. सिकंदर खान, अभिषेक पांड्ये, रशीदभाई आणि सहकाऱ्यांनी वाटप केले.