शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नावनोंदणी केलेले पण ‘एसएमएस’ न आलेले सेवकही घेऊ शकतात लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:13 IST

पुणे : शासनाच्या आदेशानुसार शहरात सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात झाली असून, या टप्प्यात लसीकरणासाठी शहरातील सुमारे ...

पुणे : शासनाच्या आदेशानुसार शहरात सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात झाली असून, या टप्प्यात लसीकरणासाठी शहरातील सुमारे ६२ हजार ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ यांनी नोंदणी केली आहे़ यापैकी ज्यांना लागलीच लस घ्यावयाची आहे व ज्यांचे नाव नोंदविले आहे़ असे सेवक ‘को-विन अ‍ॅप’व्दारे लसीकरणासाठी येणाऱ्या ‘एसएमएस’ची वाट न पाहता स्वत:हून जाऊन लस घेऊ शकतील़ अशी माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ़ आशिष भारती यांनी दिली़

शासनाच्या आदेशानुसार, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ५६ हजार आरोग्य सेवकांनी नोंद केली होती़ यापैकी साधरणत: २४ हजार आरोग्यसेवकांनी लस आत्तापर्यंत घेतली आहे़ अनेक आरोग्य सेवकांनी या लसीकरणाकडे पाठ फिरवली असल्याने, पहिल्या टप्प्यात आजपर्यंत ४३ टक्केच लसीकरण झाले आहे़ यामुळे दुसऱ्या टप्प्यात ज्या सेवकांनी नोंदणी केली आहे व ज्यांना लसीकरणासाठी ‘एसएमएस’आला नाही असे सेवक स्वत:हून जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतात़ परंतु, यासाठी त्यांचे नाव लसीकरणासाठीच्या संगणकीय यादीमध्ये असणे आवश्यक आहे़ या संगणकीय प्रणालीत नोंद करूनच त्यांना लस देण्यात येणार असून, लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात येईल असे डॉ़ भारती यांनी सांगितले़

शहरात सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुस-या टप्प्यास सुरुवात झाली आहे़ यामध्ये ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणजेच कोरोना काळात काम करणाऱ्या पालिका, शासन, पीएमपीएमएल, शासकीय कार्यालयांमधील चालक, कंत्राटी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षारक्षक आदी शासकीय सेवकांना लस दिली जाणार आहे. तसेच पोलिसांनाही या दुसºया टप्प्यात लस देण्यात येणार असून, शुक्रवारपर्यंत सुमारे २०० पोलिस कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे़

--------------------------------------------