शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी पद्धतीच्या विरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:13 IST

संघटनांचा निर्धार : देशभरातील कामगारांचे पुण्यात अधिवेशन

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज कंत्राटी पद्धतीच्या कामगारांकडून करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. या कामगारांना कसल्याही सुविधा दिल्या जात नाहीत व पिळवणूक केली जाते. त्यामुळे या पद्धतीच्या विरोधात देशव्यापी लढा उभारण्याचा निर्धार देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामगार संघटनांच्या शिखर संस्थेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी करण्यात आला.

आॅल इंडिया म्युनिसिपल वर्कर्स फेडरेशनचे (संलग्न ऐक्टू ) दुसरे तीन दिवसीय अखिल भारतीय खुले अधिवेशन डेंगळे पूल येथील श्रमिक भवन येथे शनिवारी सुरू झाले. पुणे महापालिका कामगार युनियन या अधिवेशनाची निमंत्रक आहे. ज्येष्ठ कामगार नेते शामलाल प्रसाद अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी आहेत. तमिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांतील अनेक कामगार संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. पुणे महापालिका कामगार युनियनच्या सरचिटणीस मुक्ता मनोहर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद््घाटन झाले. त्या म्हणाल्या, केंद्र सरकारचे स्वच्छ भारत अभियान हे तकलादू व निव्वळ दिखाऊ स्वरूपाचे आहे. नेतेमंडळींनी हातात झाडू घेऊन स्वत:ची प्रतिमा तयार करण्याचा हा प्रकार आहे. अशा कामांमधून कंत्राटी कामगारांचे तसेच कायम कामगारांचेही शोषणच होत असते. कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून सरकार धर्मवाद, प्रांतवाद, जातीयवाद, आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशातील सर्व कामगारांनी एकत्र येऊन तो हाणून पाडला पाहिजे.

स्वागत व प्रास्ताविक उदय भट यांनी केले. पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या ७४ वर्षांच्या कालावधीत केलेल्या कामाचा त्यांनी धावता आढावा घेतला. मिलिंद रानडे यांनी मुंबई महापालिकेतील कचरा उचलण्याचे काम कंत्राटी पद्धतीने करणाऱ्या कामगारांना कायम करण्यासाठी मुंबई महापालिकेत दिलेल्या लढ्याची माहिती दिली. बारमाही चालणाºया कामात खाजगीकरण व ठेकेदारी पद्धतीचा अवलंब करता येणार नाही असे ते म्हणाले. ज्येष्ठ कामगार नेते क्लिफटंन, बाळासाहेब सुरूडे व अन्य नेत्यांची भाषणे झाली. तीन दिवसीय या अधिवेशनाचा २७ आॅगस्टला समारोप होणार आहे.खुल्या अधिवेशनात कंत्राटी कामगार पद्धती म्हणजे गुलामगिरीची प्रथा पुन्हा सुरू करण्याचाच प्रकार असल्याची टीका करून त्याविरोधात देशव्यापी लढा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्याशिवाय देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्य सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी व्हावी, कामगार संघटनांना कोणताही कामगार विषयक कायदा करू नये असे ठराव मंजूर करण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणे