शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

...तर वीजपुरवठा होणार खंडित; पुणे परिमंडळात वीजबिलांची थकबाकी ३९६ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:14 IST

पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात वीज ग्राहकांची थकबाकी ३९६ कोटी रुपयांवर गेली आहे. या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव व मुळशी तालुक्यामध्ये विशेष लक्ष केंद्रितमहावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी

पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषीपंपधारक वीज ग्राहकांची थकबाकी ३९६ कोटी रुपयांवर गेली आहे. या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव व मुळशी तालुक्यामध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून तत्काळ वीज बील भरण्याचे आवाहन मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी केले आहे. पुणे परिमंडलामध्ये ६ लाख ८४ हजार ५६७ ग्राहकांकडे १७० कोटी रुपयांची थकबाकी असून यातील ५ लाख ८१ हजार ३४० घरगुती ग्राहकांकडे १०७ कोटी ३९ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील ८९ हजार ७२० ग्राहकांकडे ४३ कोटी ६१ लाख तर १३ हजार ५०७ औद्योगिक ग्राहकांकडे १९ कोटी १५ लाख रुपयांची थकबाकी आहे. यासोबतच ८४ हजार ८० कृषीपंपधारकांकडे तब्बल २२६ कोटी ६३ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदार कृषीपंपधारकांनी एप्रिल २०१७ पासूनच्या चालू वीजबिलांचा भरणा केला नसल्यास कृषीपंपाचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.पुणे, पिंपरी, लोणावळा, चाकण, तळेगाव आदी शहरांसह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणे