शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाविरोधात संताप!, विद्युतपंपांची सलग १६ तास वीज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 06:41 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आॅक्टोबर हीटमध्ये सुरू असलेल्या भारनियमनामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून, विद्युतपंपाच्या विजेचे सलग १६ तासांहून अधिक काळ भारनियमन केले जात आहे. तसेच, भारनियमनाव्यतिरिक्त उपलब्ध असलेली वीजही वारंवार खंडित होत असल्याने विजेचा विषय शेतकºयांच्या दृष्टीने डोकेदुखीचा बनू लागला आहे. याविरोधात संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी भोसे येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहूळ, कोयाळी भानोबाची, मोहितेवाडी, शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, गोलेगाव, वडगाव घेनंद, भोसे, नवीनगाव आदी गावांमध्ये मागील सात-आठ महिन्यांपासून विद्युत पंपाच्या विजेचे दिवसा १६ तास भारनियमन सुरू आहे. भारनियमन तसेच विजेच्या लपंडावाला बळी पडणारी ही गावे बारमाही पिकांच्या उत्पादनात अग्रेसर असून सलग होणाºया भारनियमनामुळे या गावांमधील रब्बी हंगामातील कांद्याच्या लागवडी तसेच अन्य पिकांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.भोसे येथे शुक्रवारी (दि. ७) शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी विजेच्या समस्या निवेदनाद्वारे मांडण्यासाठी गेले असता, कार्यालयातील अधिकाºयांनी पळ काढला. निवेदन स्वीकारण्याचे धाडस केले नाही. अखेर शेतकºयांनी आक्रमक भूमिका घेऊन कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र भावना व्यक्त केल्या.या प्रसंगी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, रोहिदास दौंडकर, सुभाष पवळे, उपसरपंच एकनाथ आवटे, रवींद्र आवटे, संदीप पोटवडे, वस्ताज दौंडकर, कांताराम लोणारी, बबनराव दौंडकर, दत्ता सोनवणे, कैलास आरगडे, रामदास आवटे आदींसह अन्य आंदोलक शेतकरी उपस्थित होते.अठरा तासांचे भारनियमन कमी करण्यासंदर्भात महावितरण कंपनीकडे शेतकरी वारंवार विनवणी करीत आहेत. मात्र, कंपनीकडून पूर्ण क्षमतेने वीज देण्यासंदर्भात कोणत्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे ऐन रब्बी हंगामातील कांदालागवडीचे आव्हान शेतकºयांसमोर उभे राहिले आहे.

भारनियमनाविरोधात संताप!बारामती : ऐन दिवाळीच्या तोंडावर भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आॅक्टोबर हीटमध्ये सुरू असलेल्या भारनियमनामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.बारामती शहरात किरकोळ भारनियमन सुरू आहे. बारामती शहर व एमआयडीसी परिसरात एकूण ८ वीजवाहिन्या आहेत. त्यांपैकी ७ वाहिन्या ए गटात व अवघी एक वाहिनी सी गटात आहे. त्यामुळे शहराला भारनियमनाचे जास्त चटके बसले नाहीत. शहरातील सी वाहिनीवरील केवळ थोड्या भागात सकाळी व दुपारी या दोन टप्प्यांत ४.४५ तास भारनियमन झाले. तर, उर्वरित शहर ए गटात असल्याने सकाळी ६ ते ७.३० या वेळेत केवळ दीड तास भारनियमन करावे लागले, अशी माहिती महावितरणच्या अधिकाºयांनी दिली.बारामती मंडलातील वाणिज्यिक व वितरण हानी जास्त असलेल्या वाहिन्यांवरील वीजग्राहकांना जास्त भारनियमनाचा फटका बसला. मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या ६ तालुक्यांत ११२ वीजवाहिन्या आहेत. यात ए गटात ११, बी गटात ४, सी गटात १७, डी गटात १८, ई गटात २०, एफ गटात ८, जी-१ गटात ७, जी-२ गटात ६ व जी-३ गटात २१ वीजवाहिन्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या टप्प्यात ए गटात ३.१५ तास, बी- ४ तास, सी-४.४५ तास, डी-५.३० तास, ई-६.१५ तास, एफ-७ तास, जी-१ मध्ये ७.४५ तास, जी-२ मध्ये ८.३० तर जी-३ या गटात ९.१५ तास भारनियमन होते.वीज नसल्याने दुर्गम भाग चाचपडतोयभोर : शहरात व ग्रामीण भागात दररोज सकाळी २ तर सायंकाळी २ असे ४ तासांचे भारनियमन करण्यात येणार आहे. शिवाय दर तासाला अधुनमधुन वारंवार वीज गायब होत आहे. वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देताच वारंवार खंडित होत होता.भोर शहरात सकाळी ९.३० ते ११.४५ व दुपारी ३.३० ते ६ वाजेपर्यंत भारनियमन तर ग्रामीण भागात सोमवार ते गुरुवार सकाळी ७ ते ९.३० तर दुपारी २.४५ ते ५, शुक्रवार ते रविवार सकाळी ९.३० ते ११.४५ व दुपारी ३.३० ते ६ या वेळात भारनियमन करण्यात येणार आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावे भोरपासून ६० ते ७० किमी अंतरावर असून सध्या पावसाचे दिवस आहेत. वादळी वाºयासह पावसामुळे झाडांची पडझड होऊन वीजवाहक तारा तुटतात. अनेक खांब वाकतात आणी वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. १० गावांना मिळून एकवायरमन आहे. अनेक गावांत पावसाळ्यात महिनामहिना वीजपुरवठा नसतो. तुटलेल्या तारा जोडणे, खांब उभे करणे, ही कामे तर कधीच वेळेवर होत नाहीत. त्यामुळे दुर्गम डोंगरी गावातील लोकांना रात्ररात्र अंधारातच काढावी लागते.

टॅग्स :Puneपुणे