शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

थकीत बिलांमुळे वीज कनेक्शन तोडलं, संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 20:31 IST

मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी, यापुढे वीजजोड तोडल्यास आंदोलनाचा इशारा 

सांगवी : कृषी पंपासह सर्वच वर्गवारीतील थकबाकी असणाऱ्या ग्राहकांच्या वीजजोड तोडण्याच्या आदेशानंतर सांगवी,शिरवली,खांडज,कांबळेश्वर येथील विद्युत वीजजोड तोडण्याच्या कारवाई विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत महावितरण कर्मचारी व अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक होऊन अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने बारामती परिसरात पाठ फिरवली आहे.परिणामी खरीप पिकावर मोठ्या प्रमाणात फटका बसला. शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीनचे पीक पाण्या अभावी जळून चालले आहे. उसाची पिके देखील आता जळण्याच्या मार्गावर आहेत. सुदैवाने धरण परिसरात झालेल्या पावसामुळे नदीला चांगल्या प्रकारे पाणीसाठा आहे. परंतु, शेतकऱ्यांची थकबाकी असल्याने ट्रान्स्फॉर्मर सोडवल्यामुळे पाणी असून ही शेतकरी हतबल झाले आहेत.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सांगवी येथील महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत वाद घातला.सरकारने जाहिर केलेली कृषी संजीवनी योजनेत शेतकरी सहभागी होण्यास तयार आहेत. या योजनेत सहभागी होण्याची मुदत  मार्च २०२२ आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची गंभीर परिस्थीती असल्यामुळे विद्युत अधिकारी यांना अपेक्षित असलेली थकीत रक्कम देण्यासाठी शेतकरी असमर्थ आहेत. यामुळे उसाची तोडणी होईपर्यंत,किंवा सोयाबीनचे पीक निघेपर्यंत महावितरणने मुदतवाढ द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. परंतू, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आल्यामुळे आम्ही मुदतवाढ देण्यासाठी असमर्थ असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातून शेतकरी आणि महावितरण अधिकाऱ्यांच्या शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून वाद मिटविण्याचा प्रयत्न झाला. शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते. जर यापुढे देखील विद्युत वीज तोडची भूमिका अशीच राहिली तर उग्र आंदोलन,रास्ता रोको व उपोषण या मार्गाचा अवलंब करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

टॅग्स :BaramatiबारामतीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी