शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘यशवंत’च्या भांडवलावरच होणार निवडणूक

By admin | Updated: January 28, 2017 00:15 IST

आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत. सर्वच राजकीय पक्षांना इतर कोणतेही ठोस मुद्दे

लोणी काळभोर : आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत. सर्वच राजकीय पक्षांना इतर कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या थेऊर येथील बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची आठवण येऊ लागली आहे. या निवडणुकीतही हवेलीत यशवंत बंद या प्रश्नाच्या भांडवलावरच लढवली जाणार हे नक्की झाले आहे.निवडणूक आल्यावरच राजकीय पुढाऱ्यांना केवळ एकगठ्ठा मतांसाठी यशवंत कारखान्याची आठवण होते. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आपल्या सोयीनुसार यशवंत बंद पडला, या विषयाचा वापर करून केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून शेतकरी सभासदांच्या भावनांशी खेळ करून निवडणुकीपुरता हा विषय भिजत ठेवूत मते मिळवतात. इतरवेळी मात्र त्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. कारण या विषयांवर राजकारण करून निवडून येऊन सत्तेत मश्गूल झालेले विद्यमान खासदार व आमदारही अद्यापही याविषयी मौन बाळगून आहेत. या परिसरातील ऊस नेण्यास कुट्टीच व गुऱ्हाळचालक टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. बाजारभाव व ऊसबिलाची खात्री नसतानाही केवळ नाइलाज म्हणून शेतकऱ्यांना कुट्टी व गुऱ्हाळमालकांची मनधरणी करावी लागत आहे. या कारणामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल झाला आहे. यशवंत सुरू करण्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घ्या, परंतु कारखाना सुरू करून येथील शेतकऱ्यांचे संसार वाचवा, अशी भावना व्यक्त होत आहे. यशवंतची चाके आर्थिक गर्तेत खोल अडकल्याने संबंधित सहकारी संस्थांवरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे.हवेली तालुक्यातील यशवंत कारखाना व हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या सहकारी संस्था तालुक्याच्या मुख्य रक्तवाहिन्या मानल्या जात होत्या व येथूनच सहकाराच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबातील काही जण आमदार, खासदार, विविध बॅँकेचे संचालक व तालुक्यातील महत्त्वाच्या पदी निवडले गेले. त्यामुळे एकेकाळी यशवंत व हवेलीचा जिल्ह्यातील राजकारणात दबदबा होता. परंतु काही संचालकांच्या गलथान व भ्रष्ट कारभारामुळे यशवंतला घरघर लागल्याने तालुक्याच्या शेतकरी सभासदांचे अर्थकारण मंदावले आहे. या भागातील ऊसपिकाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. (वार्ताहर)