शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांमध्ये भिनली निवडणूक

By admin | Updated: October 9, 2014 05:32 IST

अंगात निवडणुकीचे वारे संचारलेले, इतर कशाचेच भान नाही अशा तल्लीन भावनेने रात्रीचा दिवस करून शहरातील कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या प्रचारात दंग झाले आहेत

पिंपरी : अंगात निवडणुकीचे वारे संचारलेले, इतर कशाचेच भान नाही अशा तल्लीन भावनेने रात्रीचा दिवस करून शहरातील कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या प्रचारात दंग झाले आहेत. प्रत्येक कामात नियोजनबद्धता आणि अहोरात्र राबून आपल्या अनोख्या ‘पॉलिटिकल मॅनेजमेंट’च्या जोरावर हे कार्यकर्ते आमदार होऊ इच्छिणाऱ्यांना विजयाचा भरवसा देत आहेत. या वातावरणामुळे जल्लोषपूर्ण वातावरण प्रत्येक उमेदवारांच्या ‘वॉर रूम’मध्ये दिसत आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, तसेच मावळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे पक्षाचे, तसेच अपक्ष उमेदवार यांच्या प्रचाराचा वेग आणि जोर चांगलाच वाढला आहे. आपल्या नेत्याचे राजकीय भवितव्य उजळून काढण्यासाठी असंख्य हातांसह अनेक डोक्यांच्या ‘सुपीक कल्पना’ कामी येत आहेत. प्रचाराचे नवनवे फंडे वापरून आपण कसे वेगळे व सरस ठरू यासाठी कित्येकजण कामाला लागले आहेत. सकाळी ७ पासूनच लोकांची अशा ठिकाणी वर्दळ सुरू होत असून, कार्यकर्ते कामाला लागत आहेत. दिवसभर नियोजन जबाबदारी पार पाडून पुन्हा उद्यासाठी ते सज्ज होत आहेत.अहोरात्र नियोजन दिवसा उमेदवारांच्या प्रचारासाठी ठरावीक वेळमर्यादा पाळली जात असली, तरी उद्याचा प्रचार कसा असेल याचे पूर्वनियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांना क्षणाचीही उसंत नसते. म्हणूनच बहुतेक प्रबळ दावेदार असलेल्या उमेदवारांच्या नियोजनस्थळी आळीपाळीने जागून नियोजनात व्यस्त असणाऱ्या खंद्या कार्यकर्त्यांमुळे रात्रही जागीच असल्याचे जाणवते. दिवसभरात घडलेल्या घडामोडींची खलबते, चर्चा सुरूच असतात. विरोधी गोटातील हालचालींवर नजर ठेवून त्यावर उतारा शोधणे, राजकीय बातम्यांचे संकलन करणे, त्यातील महत्त्वाचे मुद्दे काढून नेत्यांना प्रचारात उपयोग होण्यासाठी वेळीच देण्याची तयारी करणे अशा कामांनी रात्र जागती राहत आहे. महिलांहाती प्रचाराची दोरीउमेदवाराचा प्रचार प्रत्येक घरातील महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना जागृत करण्यासाठी महिला कार्यकर्त्यांवर जबाबदारी आहे. चूल आणि मूल पाहणाऱ्या महिलांच्या हाती प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. उमेदवाराचे जाहीरनामा, निवेदनपत्रक वाटणे, स्टिकर चिकटवणे अशी कामे महिलांच्या हाती सोपविली जात आहेत. घर सांभाळूनही महिला प्रचाराची मोहीम लीलया फत्ते करताना दिसतात. आपुलकीने विचारपूस करणे व बोलण्याचे कौशल्य यातून जाणवते.न्याहारीच धावतेय कार्यकर्त्यांमागेकार्यकर्त्यांना चहापान व जेवणाची सोयही तितकीच महत्त्वाची असल्याने त्याकामी नियोजनात कोणतीच कसर ठेवली जात नाही. खास नेमलेल्या आचाऱ्यांमार्फत तयार चहा, नाष्ट्यासह दोनवेळच्या सकस आहाराची प्रत्येक ठिकाणी सोय केली आहे. बहुधा हॉटेलमध्ये, नियोजनस्थळी अथवा प्रचार सुरू आहे अशा ठिकाणी सोय केलेल्या जागेपर्यंत वाहनांमधून तयार न्याहारी पार्सल स्वरूपात अथवा मोकळ्या जागी बुफे पद्धतीने पोहोचविली जात आहे. दमदार भोजन, जोरदार प्रचाराचे सूत्र खवय्ये कार्यकर्त्यांत प्रचलित झाले आहे. सायंकाळीही चहा, बिस्किटे व पसंतीनुसार सुकामेव्याचा खुराक वाढला जातो. मतदार राजाच्या सेवेसह प्रबोधनमतदारांना उमेदवाराचे अचूक नाव (नावात साधर्म्य असलेले प्रतिस्पर्धी असल्याने) दर्शविणे, निवडणूक चिन्हे पटवून सांगणे, मतदान यंत्रावर नाव कोणत्या क्रमांकाला आहे हे समजावण्यासाठी कार्यकर्ते विशेष परिश्रम घेताना दिसतात. प्लॅस्टिक अथवा पुठ्ठ्यापासून बनविलेल्या मतदानयंत्राच्या प्रतिकृतींचा वापर केला जात आहे. मतदारांना ऐनवेळी गैरसोय होऊ नये यासाठी त्यांचे मतदारयादीत नाव आहे की नाही हे दाखविण्यासाठी प्रत्येक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक विभागाच्या वेबसाइटचा आधार घेतला आहे. नाती गुंफण्यात ज्येष्ठही सज्जउमेदवार कोणाचा मुलगा, कोणाचा पुतण्या, कोणाचा भाचा, कोणाचा दूरचा नातेवाईक असतो. उमेदवारी मिळालीच आहे, तर त्याच्या हाती यश मिळावे यासाठी सर्व रक्ताच्या नात्यांना गुंफण्याचं काम हाती घेण्यात सर्व ज्येष्ठ मंडळी सरसावली आहेत. सफेद शर्ट, पायजमा टोपी, कुर्ता, धोतर,मिशीला पीळ, केस पांढरे झालेले तरीही करारीपणाने निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या वस्ताद मंडळींचा उत्साह देखील वाखाणण्याजोगाच आहे.