शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे, बारामतीची निवडणूक प्रक्रिया २८ मार्चपासून; मावळ, शिरूरची २ एप्रिलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 01:51 IST

जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीची घोषणा केली असून महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे.त्यात पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघापैकी पुणे व बारामती लोकसभा निवडणूक प्रक्रिया येत्या २८ मार्च पासून तर मावळ, शिरूर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया येत्या २ मे पासून सुरू होणार आहे,असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.लोकसभेची आचार संहिता लागू झाली असून पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघात तिस-या टप्प्यात आणि मावळ व शिरूर मतदार संघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांची अधिसूचना प्रसिध्द होण्यापासून अर्ज भरण्याचा कालावधी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखांबाबतचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्द केले आहे.पुणे व बारामती लोकसभेसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदार संघाची निवडणूकीची अधिसूचना २८ मार्च रोजी प्रसिध्द होणार आहे. पुणे , बारामती मतदार संघासाठी ४ एप्रिलपर्यंतच उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र)सादर करता येतील. प्राप्त अर्जांची छाननी ५ एप्रिल रोजी होणार असून ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर शिरूर व मावळ मतदार संघाची आधिसूचना २ एप्रिल रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून येत्या २९ एप्रिल रोजी या दोन्ही मतदार संघात मतदान होणार आहे.शिरूर,मावळमधून निवडणूक लढविणा-या उमेदवारांना ९ मे पर्यंतच उमेदवारी अर्ज सादर करता येतील. येत्या १० एप्रिल रोजी प्राप्त अर्जांची छाननी केली जाणार आहे. या मतदार संघातील उमेदवारांना १२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.जिल्ह्यातील चारही मतदार संघाची मतमोजणी येत्या २३ मे रोजी होईल,असेही नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रममतदार संघ    अर्जाचा अंतिम दिनांक    अर्ज मागे घेण्याचा दिनांक   मतदानाचा दिनांकपुणे                       ४ एप्रिल                             ८ एप्रिल                         २३ एप्रिलबारामती               ४ एप्रिल                              ८ एप्रिल                         २३ एप्रिलशिरूर                  ९ एप्रिल                             १२ एप्रिल                        २९ एप्रिलमावळ                  ९ एप्रिल                              १२ एप्रिल                        २९ एप्रिल

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९