बारामती : निवडणुकीच्या वादातून घराचे छप्पर पेटवून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मेडद (ता. बारामती) गावच्या सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीताराम छगन कांबळे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सरपंच अर्जुन शंकर यादव, सोनाजी पांडुरंग यादव, रोहिदास रामचंद्र निकम (सर्व रा. मेडद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत फिर्यादी कांबळे पोलिंग एजंट म्हणून काम करीत असताना त्यावेळी भांडण झाले होते. यावरून अर्जुन यादव यांनी कांबळे यांचे राहत्या घराचे छप्पर पेटवून जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली. २२ आॅक्टोबर रोजी रात्री १ वाजता हा प्रकार घडला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम करीत आहेत. (प्रतिनिधी)
निवडणुकीचा वाद; छप्पर पेटविले
By admin | Updated: October 23, 2014 05:21 IST