शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ मार्चपूर्वी, मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू - सुभाष देशमुख  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 02:27 IST

राज्यातील मुदत संपलेल्या सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या ३१ मार्चपूर्वी घेण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यादाच नवीन सहकार कायद्यानुसार या निवडणुका होणार असून, यासाठी आवश्यक असलेली निवडणूक नियमावली तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच बोगस मतदान टाळण्यासाठी या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनद्वारे व मतदार आधार लिंक करून घेण्यात येणार असल्याचे राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले.

पुणे : राज्यातील मुदत संपलेल्या सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या ३१ मार्चपूर्वी घेण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यादाच नवीन सहकार कायद्यानुसार या निवडणुका होणार असून, यासाठी आवश्यक असलेली निवडणूक नियमावली तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच बोगस मतदान टाळण्यासाठी या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनद्वारे व मतदार आधार लिंक करून घेण्यात येणार असल्याचे राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले.राज्यातील अनेक बाजार समित्यांच्या निवडणुका दहा- बारा वर्षांपासून रखडल्या आहेत. सर्वाच्च न्यायालयाने देखील निवडणुकीची सर्व प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून निवडणुका घेण्याचे आदेश शासनाला दिले आहेत.याबाबत देशमुख यांना विचारले असता देशमुख यांनी सांगितले की, सहकार विभागाने केलेल्या तापसणीमध्ये राज्यात तब्बल ११ हजार सहकारी संथ्या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले आहे. या सहकारी संस्थांचा उपयोग केवळ निवडणुकीत बोगस मतदानासाठी केला जात असल्याची शंका आहे. यात अनेक संस्था या काही विशिष्ट कुटुंबीयांच्या घरातील सदस्यांच्या ‘पिशव्यातल्या’ संस्था होत्या. त्यामुळे शासनाने सहकारी संस्था व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकासाठी अत्यंत कडक व बोगसगिरी टाळण्यासाठी सुक्ष्म नियोजन करत आहेत. यासाठी प्रथमच या सर्व निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मिशिन (ईव्हीम) द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदार आधार लिंक करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहकार नवीन कायद्यानुसार थेट शेतकºयांमधून संचालक मंडळावर प्रतिनिधीची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शेतक-याला मतदानाचा अधिकार देण्यात येणार आहे.या वेळी ज्या शेतकºयांच्या नावावर किमान दहा गुंठे जमीन आहे, त्यांना मतदानचा अधिकार मिळणार आहे. तसेच पुढील निवडणुकीत यामध्ये बदल करून किमान तीन वर्षे बाजार समितीत शेतमाल विक्री व्यवहार केलेल्या शेतकºयांना मतदानासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या निवडणुकांची अंतिम नियमावली तयार झाली आहे.सहकारी संस्थाचे खाजगीकरण करणारे विरोध करणारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा कृषी बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याला विरोध आहे. याबाबत सुभाष देशमुख म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांमध्ये सहकारी कारखाने, दूधसंघ, सूतगिरण्या, खरेदी-विक्री संघाची दुरवस्था कोणी केली, खासगी कारखाने, दूधसंघ कोणत्यापक्षाच्या नेत्यांचे आहेत, असा सवाल उपस्थित करीत. ज्या शेतक-यांसाठी या संस्था काढल्या, त्या शेतक-यांना आमच्या सरकारने थेट मतदानाचा अधिकार दिल्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विरोध का करतात, त्यांना नेमकी कशाची भीती आहे, असा प्रश्न उपस्थित करत सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका होणारच, याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखGovernmentसरकारPuneपुणे