शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

महाविद्यालयांमध्ये ‘इलेट्रोरल लिटरसी क्लब’ - सौरभ राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 9:58 PM

निवडणूक प्रक्रिया समजावून घेणे, लोकशाहीला बळकटी देणे आणि तरुणांमध्ये याविषयी जागृती निर्माण करणे यासाठी महाविद्यालय स्तरावर  ‘इलेक्टोरल लिटरसी क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे.

पुणे : निवडणूक प्रक्रिया समजावून घेणे, लोकशाहीला बळकटी देणे आणि तरुणांमध्ये याविषयी जागृती निर्माण करणे यासाठी महाविद्यालय स्तरावर  ‘इलेक्टोरल लिटरसी क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत ७४ महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. केंद्रिय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदार पुनरिक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे. मतदार नोंदणीसाठी ४९ हजार अर्ज आले असून यातील ३७ हजार ३७७ मतदारांची डेटा एंट्री पूर्ण झाली आहे. तर १२ हजार मतदारांची माहिती भरण्याचे काम सुरु आहे. यामध्ये आॅनलाईन २५ हजार ८०१ अर्ज आलेले आहेत. तर २६ हजार ८६० अर्ज आॅफलाईन आलेले आहेत. या अर्जांची १०० टक्के माहिती भरुन ३१ डिसेंबरपर्यंत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर १० जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे राव यांनी सांगितले. या कामासाठी जिल्ह्यामध्ये २१ निवडणूक अधिकारी आणि ३८ सहायक निवडणूक अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. वेळ कमी असल्याने तीन पाळींमध्ये काम करण्यात येत आहे. जनजागृती करण्याबरोबरच विद्यापीठ, महाविद्यालयीन स्तरावर युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यासोबतच केंद्रिय निवडणूक आयोगाने एक जानेवारी २०१८ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या मतदारांसह १ जानेवारी २००० या दिवशी जन्म झालेल्या ‘सहस्त्रक मतदारां’ची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मतदारांना  ‘युथ आयकॉन’ म्हणून निवडण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिवस या दिवशी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा व शहर मिळून २१ मतदार संघांमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जाणार आहे. यासोबतच दिव्यांग मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी आस्था निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, विविध सामाजिक संस्था सहभागी होणार असून त्यांच्या समन्वयातून मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी निवडणूक प्रक्रियेविषयी संवाद होत राहीला तर लोकशाहीला बळ मिळेल या उद्देशाने महाविद्यालय स्तरावर स्थापन करण्यात येत असलेल्या  ‘इलेक्टोरल लिटरसी क्लब’ची संख्या २०० नेणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.