शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde On Amit Shah : अमित भाई दिलेला शब्द पाळतात, त्यांच्यासाठी तो 'पत्थर की लकीर' असतो : एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 22:02 IST

शनिवारी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात modi@20 पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं एकाच मंचावर आले होते.

CM Eknath Shinde on Amit Shah : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. यानंतर शनिवारी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात modi@20 पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं एकाच मंचावर आले होते. यावेळी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह हे दिलेला शब्द पाळतात असं म्हटलं.

“अमित भाई दिलेला शब्द पाळतात. दिलेला शब्द त्यांच्यासाठी पत्थर की लकीर असते. मला तसे ते म्हणाले होते आणि त्यांनी आपला शब्द पाळला,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. नरेंद्र मोदी संपूर्ण जगात लोकप्रिय आहेत. त्याची प्रचिती मला डाओसमध्ये आली. बऱ्याच देशाचे प्रमुख मंत्री त्याठिकाणी आले होते. नरेंद्र मोदी आणि आपल्या देशाविषयी फार आदराने बोलत होते, असंही ते म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था उंचावर नेली. देशाची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावर नेली. जी २० चे प्रतिनिधीत्व आपण केलं, ही फार अभिमानाची गोस्ट आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले. म्हणूनच त्यांची कीर्ती जगभर पसरली. त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे,” असं त्यांनी नमूद केलं. बाळासाहेब सांगायचे मला एक दिवस पंतप्रधान बनवा मी कलम ३७० हटवतो. ३७० कलम हटवण्याचं काम अमित शाहंनी केलं, राम मंदिराचं काम लवकरच होईल म्हणून लोकांच्या मनात जे आहे तेच आम्ही केलं. काही गोष्टी वेळेवर होतात, कालही एक गोष्ट झाली,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

काय म्हणाले फडणवीस? आपण सौभाग्यशाली आहोत की आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते लाभले. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व वैश्विक नेतृत्व आहे. केवळ भारताचे पंतप्रधान एवढ्यापुरते ते मर्यादित राहिलेले नाहीत, तर संपूर्ण विश्व ज्या नेतृत्वाकडे आदराने पाहते, अशा प्रकारचे नेतृत्व पंतप्रधान मोदी आहेत, असे कौतुकोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस