शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पर्यावरणस्नेही मेट्रो शहरी जीवन आनंददायी करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 05:40 IST

परदेशी जीवनशैलीचे कौतुक नाही; मात्र तिथे जीवन आनंददायी करण्याचा प्रयत्न असतो. आता भारतातही शहरांमधील जीवन आनंददायी होणार आहे. मेट्रो हा त्याचाच एक भाग आहे.

पुणे : परदेशी जीवनशैलीचे कौतुक नाही; मात्र तिथे जीवन आनंददायी करण्याचा प्रयत्न असतो. आता भारतातही शहरांमधील जीवन आनंददायी होणार आहे. मेट्रो हा त्याचाच एक भाग आहे. ही मेट्रो १०० टक्के पर्यावरणस्नेही करण्याचा महामेट्रो कंपनीचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महामेट्रो कंपनीच्या वतीने औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. दीक्षित यांच्यासह या वेळी आमदार विजय काळे, वनस्पतीतज्ज्ञ आनंद कर्वे, आयटीआयचे प्रमुख राजेंद्र घुमे, मुख्याध्यापक प्रकाश सायगावकर आदी उपस्थित होते. या वेळी कर्वे, प्रा. परचुरे, विलास कुलकर्णी, प्रज्ञा ठाकूर, सुधीर जठार, आनंद चोरडिया, रमेश राव आदींचा पर्यावरणविषयक परिसंवाद झाला. त्यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने महामेट्रो कंपनीला काही सूचना केल्या.दीक्षित म्हणाले, ‘‘मेट्रोचा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक असणार आहे. वृक्षांची लागवड हा त्यातला एक भाग आहे. आतापर्यंत तीन हजार वृक्ष लावण्यात आले आहेत, तर मेट्रो मार्गात येणाऱ्या १९५ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. मेट्रोची सर्व स्थानके सौर ऊर्जाभारीत असतील. त्यातून १७ मेगावॉट विजेचा पुरवठा होईल. मागणीच्या ६५ टक्के वीज यातून उपलब्ध होणार आहे. याच स्थानकांवर पर्जन्यजलसंचय यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यातून काही हजार लिटर पाण्याचे पुनर्भरण होणार आहे. मेट्रोमध्ये वापरण्यात येणाºया सर्व पाण्याचे रिसायकलिंग करण्यात येणार आहे.नागपूर येथील मेट्रोच्या कामात हे सर्व उपाय वापरण्यात आले. त्यामुळे नागपूरच्या स्थानकांना प्लॅटिनम दर्जा मिळाला. त्यापेक्षा पुढचे काम पुणे मेट्रोमध्ये करण्यात येणार आहे. नदीपात्रातून जाणाºया मेट्रो मार्गाचे खांब तयार करताना पर्यावरण तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येत आहे.’’

टॅग्स :Metroमेट्रो