शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

तांदळाच्या चढत्या दरामुळे निर्यातीवर परिणाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 16:45 IST

भारतातून इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब, बांगलादेश, नेपाळ आदी देशांमध्ये तांदळाची निर्यात होते.मात्र, गेल्या काही वर्षांपासून तांदळाच्या निर्यातीमध्ये चढ उतार होत आहे.

ठळक मुद्देयंदा तांदळाच्या उत्पादन ९९२ लाख टनापर्यंत वाढ एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान देशातून ४९.२५ लाख टन तांदळाची निर्यातशासनाने १० टक्क्यांपर्यंत अनुदान द्यावे,अशी अपेक्षा शेतक-यांकडून व्यक्त पुण्यात तांदळासह इतर धान्याची मोठ्या प्रमाणावर आवक

पुणे: राज्यातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील बाजार पेठेत धान्याची विक्रमी आवाक होते. त्यानुसार बाजारात गहू,ज्वारी,बाजरीची आवक सुरू झाली आहे. तसेच मागील वर्षापेक्षा यंदा तांदळाचे अधिक उत्पादन झाले आहे. मात्र, तांदळाचे दर वाढल्याने बासमती व बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये १४ टक्क्यांनी तर बासमतीच्या निर्यातीत ५ टक्क्यांनी घट झाली आहे.भारतातून इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब, बांगलादेश, नेपाळ आदी देशांमध्ये तांदळाची निर्यात होते.मात्र, गेल्या काही वर्षांपासून तांदळाच्या नियार्तीमध्ये चढ उतार होत आहे. त्यात यंदा परतीचा पाऊस कमी झाला असला तरी सुरूवातीला पाऊस चांगला झाल्याने तांदळाचे चांगले उत्पादन झाले आहे.मागील वर्षी ९७५ लाख टन तांदळाचे उत्पादन झाले होते तर यंदा तांदळाचे उत्पादन ९९२ लाख टनापर्यंत वाढले आहे. बासमती तांदूळ केवळ भारतात आणि पाकिस्तानमध्ये काही भागात पिकवला जातो.त्यामुळे तांदळाचे दर वाढूनही बासमती तांदळाच्या निर्यातीवर मोठा परिणाम झालेला नाही. मात्र,भारतात नॉन बासमती तांदळाचे दर वाढले आहेत.त्याचा परिणाम निर्यातीवर झालेला दिसून येत आहे.भारतापेक्षा कमी दरात इतर देशांमधून तांदूळाची निर्यात अधिक होत  असल्याने देशातील बिगर बासमती तांदळावर परिणाम झाला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान देशातून ४९.२५ लाख टन तांदळाची निर्यात झाली.परंतु,मागील वर्षी ५७ लाख टन तांदळाची निर्यात झाली होती.भारत तांदळाच्या नियार्तीमध्ये आजही प्रथम क्रमांकाचा देश आहे.परंतु,यंदा उत्पादन जास्त झाल्यामुळे तांदळाची निर्यात वाढवणे गरजेचे आहे.तांदळाच्या आधारभूत किमतीत वाढ झाल्याने दरातही ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.परिणामी शेतकरी कमी किमतीत तांदूळ विकण्यास तयार नाहीत. त्यामुळेच केंद्र शासनाने तांदळाच्या निर्यातीसाठी ५ टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.परंतु,शासनाने १० टक्क्यांपर्यंत अनुदान द्यावे,अशी अपेक्षा शेतक-यांकडून व्यक्त केली जात आहे, असे तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.दैनंदिन जीवनात तांदळाबरोबरच गहू,ज्वारी, बाजरी आदी धान्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.पुण्यात तांदळासह इतर धान्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते.पुण्यातील बाजारपेठेत नवीन धान्याची आवक सुरू झाली आहे.त्यात मध्य प्रदेशातून उज्जेन, रतलाम, देवास आणि इंदोर येथून लोकवन व सिहेरी गव्हाची आवक सुरू झाली आहे. गहू चांगल्या दर्जाच्या असून क्विंटलला २६०० ते ३००० हजार रुपये दर मिळण्याची शक्यता आहे. तसेच पुढील आठवड्यात गव्हाची आवक वाढणार असली तरी  दर स्थिर राहणार असल्याचे व्यापा-यांकडून सांगितले जात आहे. यंदा पाऊस कमी झाला असला तरी महाराष्ट्रात करमाळा, बार्शी, जामखेड-खर्डा या भागात ज्वारीचे चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण ज्वारी बाजारात दाखल झाली असून ज्वारीला क्विंटलला ३९०० ते ४६००रुपये दर मिळत आहे. त्याच प्रमाणे उत्तरप्रदेश व गुजरात राज्यातून बाजरीची आवक होत असून बाजरीला क्विंटलला २२०० ते २६०० रुपये दर मिळत आहे.

टॅग्स :PuneपुणेMarketबाजार