पुणे : चार वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्याला १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एन. सलीम यांनी सुनावली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना घोरपडी गाव येथे २७ एप्रिल २०१५ रोजी घडली होती.आरोपी व फिर्यादी हे एकमेकांचे शेजारी आहेत. फिर्यादी या धुण्याभांड्याची कामे करतात. कामावर जात असताना त्या पीडित मुलीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी वस्तीमधील एका महिलेवर सोपवतात. घटनेच्या दिवशी फिर्यादी कामावर गेल्या असता आरोपीने पीडित मुलीस दुकानातून बॉबी घेऊन दिली व त्याच्या घरात नेऊन विनयभंग केला. सहायक सरकारी वकील सुनील हांडे यांनी याप्रकरणी ४ साक्षीदार तपासले. आरोपीला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)
विनयभंग करणाऱ्यास शिक्षा
By admin | Updated: February 14, 2017 02:14 IST