शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणप्रेमी विद्यार्थ्यांनी केली दिवे घाटात स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:27 IST

सहाशे विद्यार्थी सहभागी : चार गाड्यांद्वारे आठ टन कचरा गोळा

सासवड : दिवे घाटाचे सौंदर्य जपावे, घाटातून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग सर्वांना बघता यावा, घाटात असणाऱ्या वनस्पतींचे व पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय, सासवड येथील वाघिरे महाविद्यालय आणि महाराष्ट्र अ‍ॅकॅडमी अशा ६०० विद्यार्थ्यांनी दिवे घाटाची स्वच्छता केली.

पुण्याला इतर ठिकाणांशी जोडणाºया अनेक घाटांपैकी दिवेघाट महत्त्वाचा आहे. पर्यावरणीयदृष्ट्या, जैवविविधता असणारा, निसर्गसौंदर्य लाभलेला असा हा घाट आहे. मात्र अलीकडील काळात वाढती रहदारी, लोकसंख्या, कचरा आणि प्लॅस्टिकचे ढीग यामुळे घाटातील पर्यावरण आणि जैवविविधतेला धोका पोहोचत आहे. त्यामुळे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून घाटाची स्वच्छता केली. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वडकीपासून सुरुवात केली, तर वाघिरे महाविद्यालय एनसीसीचे विद्यार्थी मध्यभागी, तर वरच्या बाजूने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेला सुरुवात केली.

घाटाच्या सुरुवातीला लावलेल्या फलकाचे अनावरण बंडू जगताप, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. शर्मिला चौधरी, अमित झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. घाटाच्यावर लावलेल्या फलकाचे अनावरण कल्पना साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छताजागृतीसाठी फलकावर पर्यावरणवारी असे लिहिले असून येथे कचरा टाकू नये, अशी सूचनाही केली आहे. घाटामध्ये घरगुती कचरा, पाण्याच्या बाटल्या, जुने कपडे, सडलेल्या भाज्या, हॉटेलचा कचरा, टाकाऊ पदार्थ, वैद्यकीय असा विविध प्रकारचा कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला. आदर पूनावाला यांच्या मदतीने हा कचरा उचलला. यावेळी आदर पूनावाला यांच्या ४ गाड्यांद्वारे ८ टन कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला. परिसरातील नागरिकांकडून कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सुभाष वाव्हळ, प्रा. दीपक जांभळे, डॉ. सतीश बोंगाणे यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.पाणी वाचविण्याचे आवाहन :पाणी पंचायतीच्या कल्पना साळुंके यांनी आपल्या संस्थेमार्फत असे अनेक उपक्रम घेतले जात असल्याचे सांगितले. पाण्यासाठी आम्ही काम करीत असून आपले पाण्याचे गणित कुठे तरी चुकत असून पाणी उपलब्धता आणि पाण्याचा वापर याचा नीट विचार करावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.महत्त्वपूर्ण घाटपुण्याला इतर ठिकाणांशी जोडणाºया अनेक घाटांपैकी दिवे घाट महत्त्वाचा आहे. पर्यावरणीयदृष्ट्या, जैवविविधता असणारा, निसर्गसौंदर्य लाभलेला असा हा घाट आहे. मात्र, अलीकडील काळात वाढती रहदारी, लोकसंख्या, कचरा आणि प्लॅस्टिकचे ढीग यामुळे घाटातील पर्यावरण आणि जैवविविधतेला धोका पोहोचत आहे.

टॅग्स :Puneपुणे