शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

इको फ्रेंडली सजावटींवर भर

By admin | Updated: August 29, 2014 11:25 IST

घरोघरी विराजमान होणाऱ्या गणरायाच्या सजावटीसाठी कागद व कापडाद्वारे तयार केलेल्या कृत्रिम फुल आणि आकर्षक व रेखीव विविध प्रकारच्या साहित्याला पसंती दिली जात आहे

पिंपरी : घरोघरी विराजमान होणाऱ्या गणरायाच्या सजावटीसाठी कागद व कापडाद्वारे तयार केलेल्या कृत्रिम फुल आणि आकर्षक व रेखीव विविध प्रकारच्या साहित्याला पसंती दिली जात आहे. नियमितपणे होणाऱ्या जनजागृतीमुळे प्रदूषण करणाऱ्या वस्तंूचा वापर टाळत ‘इको- फ्रेंडली’ आरास करण्यावर गणेशभक्तांनी भर दिला आहे. प्लॅस्टिक, तसेच थर्माकोल वस्तूंमुळे प्रदूषण वाढते. पर्यावरणप्रेमी संस्था, अभ्यासक सात्यताने पर्यारणपूरक उत्सवाबाबत जागृती करीत आहेत. ‘लोकमत’नेही इको फ्रेंडली गणेशोत्सवाची भूमिका मांडत सतत जनजागृती केली आहे. याचा परिणाम म्हणजे अनेक भाविक जागरूक झाले आहेत. त्यामुळे अशा सजावटीच्या वस्तूला मागणी वाढली आहे. कागद, त्याचा लगदा, कापड, लाकूड, धागा, बांबू आदीचा वापर करून आकर्षक, रेखीव सजावटीच्या कलाकुसरीचे साहित्य बाजारपेठेत गणेशभक्तांचे लक्ष वेधत आहे. चौरंग, देव्हारे, नैवेद्याचे बॉक्स, तोरण, मखर, माळा, कागदी दुर्वा, जास्वंदाची फुले, कमळ असा विविध वस्तू आहेत. महाराष्ट्र व पश्चिम बंगाल पद्धती एकत्रित करून मखरे बनविण्यात आली आहेत. गणेशोत्सवानंतर मखराचे विविध भाग वेगळे करून पुन्हा वापरता येतात. एक ते ६ फूट आकारात ही मंदिर व आसन पद्धतीचे मखरे उपलब्ध आहेत. पाचशे रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत त्याच्या किमती आहेत. कापडी फुले, रुद्राक्ष व लाकडी मण्यांचा वापर करून तयार केलेले विविध प्रकारचे हार व माळा लक्ष वेधून घेतात. त्याचबरोबर छत्री, अंबर, कळस, सिंहासन, रंगीबेरंगी व चमकीचे कापड, झुरमुळ्या, फुलदाणी आदी साहित्य आहे. पुठ्ठ्याच्या साहाय्याने तयार केलेले अष्टविनायक, सूर्यप्रकाश, कमल, मोर, सिंहासन, हत्ती, निसर्ग, इंद्रधनुष्य, अंबारी, गौरी, दगडी, हंसासन, मयूरासन आदी वेगवेगळ्या प्रकारात मखरे आहेत. ते विविध आकारांत उपलब्ध असून, १०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत आहेत. हे साहित्य मुंबईवरून मागविले जाते. दुकानात त्याची जोडणी केली जाते. मखरासोबत वेगवेगळ्या सुट्या भागांतही ते उपलब्ध आहेत. फुलाचे हार ५० ते २०० रुपये, कापडाची चुनरी १५ ते ८० रुपये मीटर आहे. फ्लॉवरपॉट ५० ते १५० रुपयांना आहे. मूर्तीखालचे आसनाचे कापड लाल, निळ्या, केसरी व पिवळ्या रंगांत असून, ते २५ पासून १५० रुपये नग आहे. (प्रतिनिधी)