शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या चांगल्या करिअरसाठी ‘यशाचा सोपा मंत्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 06:45 IST

वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. तिला योग्य जोड मिळाली, तर यश मुठीत असते. या अनुषंगाने ११वी, १२वी सायन्सचे विद्यार्थी व पालकांना करिअरसंबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी

पुणे : वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. तिला योग्य जोड मिळाली, तर यश मुठीत असते. या अनुषंगाने ११वी, १२वी सायन्सचे विद्यार्थी व पालकांना करिअरसंबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल व धैर्य उंचाविण्यासाठी चेन्नईतील ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’ आणि ‘लोकमत’ प्रस्तुत ‘यशाचे मंत्र’ या सेमिनारचे बुधवारी (दि.१७) आयोजन केले आहे. साहित्य सम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृह, राजीव गांधी अ‍ॅकॅडमी आॅफ इ-लर्निंग ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स, शिवदर्शन, सहकारनगर येथे सकाळी १० वाजता सेमिनार होणार आहे.विद्यार्थ्यांना यशस्वी करिअर आणि जीवन घडविण्याचा मंत्र या सेमिनारमध्ये मिळणार आहे. यामध्ये मोटिव्हेशनल ट्रेनर विवेक म्हेत्रे व एसआरएम युनिव्हर्सिटीचे वक्ते, असिस्टंट प्रोफेसर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअर डॉ. अशोककुमार प्रधान व आॅॅटोमोबाईल इंजिनिअरिग्ांचे प्रोफेसर आणि विभागप्रमुख डॉ. एम. लिनस मार्टिन हे मार्गदर्शन करणार आहेत. या सेमिनारच्या अगोदर विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी येताना विद्यार्थ्यांनी रायटिंग पॅड, वही, पेन सोबत आणावे. त्यानंतर सेमिनार होईल. त्या दरम्यान चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.तरी ‘यशाचे मंत्र ’या सेमिनारचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी ‘लोकमत’ कार्यालय, व्हिया व्हेंटेज, पहिला मजला, लॉ कॉलेज रोड, पुणे. ०२०-६६८४८५८६, ८८८८७५८६७६ या क्रमांकावर संपर्क साधावा.११ वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा होणार असून, यासाठी एक तास वेळ असेल. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर बुद्धिमता चाचणी, सामान्य ज्ञान (कल चाचणी) ही परीक्षा सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक टॅब, द्वितीय पारितोषिक मोबाइल, तृतीय पारितोषिक पॉवर बँक आणि उत्तेजनार्थ २ पेन ड्राइव्ह व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे मिळणार आहेत.करिअर घडविणारा उपयुक्त सेमिनार : ११ वी, १२ वीत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना ‘पुढे काय?’ हा प्रश्न सतावत असतो. काही विद्यार्थ्यांकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो. अशा वेळी आवश्यकता असते प्रोत्साहनाची आणि सुयोग्य मार्गदर्शनाची. त्यासाठी ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’चा हा सेमिनार उपयुक्त ठरणार आहे.सेमिनारची वैशिष्ट्येवाढवा आत्मविश्वास स्वयंप्रोत्साहन तंत्र व्यक्तिमत्त्व विकासअ‍ॅडमिशनची पद्धत कशी असेल? योग्य इन्स्टिट्यूट कशी निवडावी ?यशाची गुरुकिल्ली