शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दौंडचा पूर्व भाग ऐन दिवाळीत अंधारात

By admin | Updated: November 8, 2015 02:59 IST

दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वीजपुरवठा करणाऱ्या भिगवण उपकेंद्रातील ३३/२२ केव्हीच्या, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र जळाल्याने, या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या खडकी

राजेगाव : दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वीजपुरवठा करणाऱ्या भिगवण उपकेंद्रातील ३३/२२ केव्हीच्या, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र जळाल्याने, या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या खडकी, स्वामी चिंचोली, नंदादेवी, रावणगाव, राजेगाव व खानवटे या गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे बुधवारपासून ही गावे अंधारात आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्रामस्थांची धांदल उडाली आहे. विजेअभावी पाणी योजना बंद पडल्याने, या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तसेच, येथील व्यवसायही ठप्प झाले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात ५ एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविण्याचे काम शुक्रवारी रात्री सुरू झाले होते. परंतु, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविण्यास किमान १0 - १२ दिवस तरी लागणार असल्याने, पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणार नसल्याने पूर्ण दिवाळी सणात विजेचा तुटवडा जाणवणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांकडून मिळाली. याबाबत दौंड महावितरणचे उपअभियंता अतुल चव्हाण म्हणाले की, रावणगाव सबस्टेशनची चाचणी शुक्रवारी (दि. ६) घेतली आहे. बुधवार-गुरुवारपर्यंत रावणगावचे सबस्टेशन चालू होईल. तसेच, भिगवण सबस्टेशन येथील ५ एमव्हीएचा (मेगा व्होल्ट अ‍ॅम्पिअर) शनिवारी रात्रीपर्यंत बसून टेस्टिंग केली जाईल. रविवारी दुपारी वीजपुरवठा सुरू होईल. १0 एमव्हीएचा ट्रान्सफार्मर बसायला ८ ते ९ दिवस लागतील. नंतर पूर्ण दाबाने वीजपुरवठा करता येईल. खडकीचे सरपंच किरण काळे म्हणाले की, रावणगाव येथील सबस्टेशन लवकरात लवकर सुरू करून, या भागातील नागरिकांना न्याय द्यावा. या भागातील गावांना दोन विभागांच्या घोळामुळे भिगवण येथील महावितरणच्या सबस्टेशनला फोन केल्यास, ‘तुमच्या विभागाला (केडगाव) विचारा’ अशी उडवा-उडवीची उत्तरे मिळतात. हद्दीच्या वादात ग्रामस्थांचे हाल दौंड तालुक्यातील खडकी, रावणगाव, नंदादेवी, स्वामी-चिंचोली, राजेगाव व खानवटे ही गावे भिगवण सबस्टेशनंतर्गत बारामती विभागाच्या अधिपत्याखाली येतात, तर प्रत्यक्षात या गावांची बिलिंग केडगाव विभागांतर्गत केले जाते. त्यामुळे भिगवण सबस्टेशन येथे दाद मागितले असता, ‘तुमच्या तालुक्यात चौकशी करा’ असे उत्तर मिळते, तर केडगाव विभागाला माहिती मागितली, तर ‘भिगवणला फोन करा’ असे सांगितले जाते. त्यामुळे या भागातील नागरिकांना कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न नेहमीच पडतो.