शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वानवडीत साकारणार ‘ई-ग्रंथालय’, महिलांसाठी संगणक प्रशिक्षण उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 02:18 IST

परिसरात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असून यूपीएससी, एमपीएससी, लॉ, पीएचडी, उच्चशिक्षण घेत असणाऱ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व वाचकप्रेमींसाठी पुस्तकरूपी भांडार म्हणून वानवडीमध्ये ई-ग्रंथालय लवकरच सुरू होणार आहे.

वानवडी : परिसरात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असून यूपीएससी, एमपीएससी, लॉ, पीएचडी, उच्चशिक्षण घेत असणाऱ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व वाचकप्रेमींसाठी पुस्तकरूपी भांडार म्हणून वानवडीमध्ये ई-ग्रंथालय लवकरच सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीने तसेच वाचनाची आवड असणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी ग्रंथालयाच्या आवश्यकतेची दखल घेत तसेच महिलांना संगणकीय प्रशिक्षण सुरू करण्याकरिता या भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी महात्मा फुले सांस्कृतिक भवनाच्या आवारातील हॉलमध्ये 'ई-ग्रंथालय' सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

वानडीमधील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये पहिल्या मजल्यावर चार छोटे हॉल व दुसऱ्या मजल्यावर दोन मोठे हॉल असून, ही इमारत मालमत्ता विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे कै. सावित्रीबाई शिवरकर बहुउद्देशीय हॉल येथील पहिल्या मजल्यावरील ७५० स्क्वे.फू.चे दोन छोटे हॉल या उपक्रमासाठी उपलब्ध करून देण्याबाबत ठरावाचे पत्र नगरसचिव कार्यालयात देण्यात आले आहे, असेही घोगरे यांनी सांगितले.

स्मार्ट पुण्यात सर्व क्षेत्र हळूहळू डिजिटल होत असताना वानवडीतील विद्यार्थी व वाचकप्रेमींना पुस्तकरूपी भांडार म्हणून ई-लायब्ररी सुरू करण्यात येणार असून, एका क्लिकवर पुस्तक वाचायला मिळणार आहे; तसेच महिलांसाठी संगणकीय प्रशिक्षण देण्याचा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.- धनराज घोगरे, नगरसेवक

टॅग्स :libraryवाचनालयcollegeमहाविद्यालय