शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या जागांचा ई-लिलाव, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हस्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:24 IST

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या रिकाम्या जागांसाठी लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या रिकाम्या जागांसाठी लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ८ जागांसाठी ई-लिलाव (आॅनलाइन आॅक्शन) करण्यात येणार आहे. यामध्ये काही जागांची पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने रात्री बसगाड्या लावण्यासाठी पीएमआरडीएकडे मागणी केली आहे. याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पीएमआरडीएने पीएमपी प्रशासनाकडे प्रस्ताव दिला आहे.वाढत्या शहरीकरणामुळे शासनाने पीएमआरडीएच्या स्थापनेनंतर कार्यक्षेत्रात मोठी वाढ केली. सध्या प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात दोन महापालिका, सात नगरपालिका आणि पाच तालुक्यांतील तब्बल ८६५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्षेत्रातील सात हजार हेक्टर शासकीय आणि मोकळ्या जागा (अ‍ॅमेनिटी स्पेस) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पीएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएच्या धर्तीवर या ‘लॅण्ड बँके’च्या माध्यमातून निधी उभारण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडून जमीन विल्हेवाट विनियम (लॅण्ड डिस्पोजल रुल) प्राधिकरणाला नुकतेच प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आठ जागांसाठी ई-लिलाव करण्यात येणार आहे.>पीएमपी बसला रात्री थांबण्यासाठी जागा नाहीया जागेचा लिलाव जाहीर केल्यानंतर पीएमपी प्रशासनाकडून पीएमआरडीएला यांपैकी काही जागा रात्री पीएमपी बसगाड्या लावण्यासाठी मागण्यात आल्या. सध्या शिवाजीनगर येथील नरवीर तानाजी आणि स्वारगेट या दोन आगारांमधून संपूर्ण पुणे शहर, उपनगर आणि काही ग्रामीण भागाच्या हद्दीपर्यंत पीएमपीच्या बसगाड्या दिवसरात्र धावतात. यांपैकी रात्रीच्या उशिराच्या बसगाड्यांना परतीचा प्रवास करताना थांबण्यासाठी कोठेही जागा उपलब्ध नाही. यामुळे रात्रीच्या वेळी पीएमपीच्या बसगाड्या उभ्या करण्यासाठी काही ठिकाणी जागांची नितांत गरज आहे. यासाठी पीएमपीकडून पीएमआरडीएकडे रिकाम्या जागांची मागणी करण्यात आली आहे.