शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ससूनमध्ये वाहन शुल्काची दुप्पट वसुली, कराराला बगल देत केली स्वत:चीच नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 04:26 IST

ससूनमध्ये विविध ठिकाणांहून गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यात आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील रुग्णांचा भरणा जास्त असतो. असे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वाहनतळ ठेकेदार करारापेक्षा दुप्पट वाहनशुल्काची वसुली करीत असल्याचे समोर आले आहे. तशी पावतीच संबंधित ठेकेदाराने तयार केली आहे.

पुणे : ससूनमध्ये विविध ठिकाणांहून गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यात आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील रुग्णांचा भरणा जास्त असतो. असे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वाहनतळ ठेकेदार करारापेक्षा दुप्पट वाहनशुल्काची वसुली करीत असल्याचे समोर आले आहे. तशी पावतीच संबंधित ठेकेदाराने तयार केली आहे.येरवड्यातील पूना स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीला येथील वाहनतळाचे कंत्राट दिले आहे. निविदेतील नियमानुसार सायकल सोडून प्रत्येक दुचाकीसाठी पहिल्या ४ तासांसाठी ५, तर, १२ तासांसाठी १० आणि २४ तासांकरिता १५ रुपये शुल्क आकारणे अपेक्षित आहे. चारचाकीसाठी पहिल्या चार तासाला १०, तर१२ तासाला २५ आणि २४ तासांकरिता ४० रुपये शुल्क आकारण्याची तरतूद आहे. मात्र, दुचाकीसाठी १२ तासांसाठी १० रुपये आकारण्यात येत आहेत. नियमाप्रमाणे चार, बारा आणि २४ अशी कोणतीही शुल्क आकारणी ठेकेदारेने ठेवलीच नाही. वाहनचालकाला एक तासासाठी वाहन लावायचे असले, तरी १२ तासांप्रमाणे १० रुपये शुल्क आकारले जात आहे. विशेष म्हणजे करारातील नमूद शुल्काचे फलकही ठेकेदाराने लावले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. करारात नियमानुसार शुल्क न आकारल्यास करार रद्द करण्याची तरतुद आहे. प्रशासनाच्या नाकासमोरच वाहनशुल्काची अधिकृत लुट सुरू आहे.वाहन चोरी गेल्यास जबाबदारी ठेकेदारावरवाहन करारानुसार वाहनतळातून वाहन चोरीस गेल्यास, ते गहाळ झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदावर सोपविण्यात आली आहे. निष्काळजीपणामुळे वाहन चोरी झाल्यास संबंधित ठेकेदाराच्या अनामत रकमेतून संबंधित वाहनाची रक्कम वसूल करण्यात येईल, असे नमूद केले आहे. ठेकेदाराने पावतीवरील सूचनेत मात्र ही जबाबदारी नाकारली आहे. त्यात चोरीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार नाही, असे लिहिले असून, वाहन आपल्या जबाबदारीवरच लावावे, अशी स्पष्ट सूचना त्यात करण्यात आली आहे. संबंधित कराराची माहिती सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी उघड केल्याने, ठेकेदाराची ही कृती समोर आली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल