शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

आचारसंहितेच्या काळात ‘प्रश्न तुमचे उत्तर कुलगुरूंचे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 03:20 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी या काळात ‘प्रश्न तुमचे उत्तर कुलगुरूंचे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

पुणे : आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय अधिकारी, पदाधिकारी यांच्याकडून घेतले जाणारे लोकशाही दिन, तक्रार निवारण कार्यक्रम तत्काळ स्थगित केले जातात. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी या काळात ‘प्रश्न तुमचे उत्तर कुलगुरूंचे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे या कार्यक्रमामुळे आचारसंहिताभंग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न अथवा सूचना ऐकून घेण्यासाठी विद्यावाणी रेडिओ केंद्राच्या माध्यमातून ‘प्रश्न तुमचे उत्तर कुलगुरूंचे’ हा कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमासाठी येत्या १२ मार्च ते १७ मार्च २०१९ या कालावधीत विद्यार्थ्यांकडून प्रश्न मागविण्यात आले आहेत. त्याला त्यानंतर कुलगुरूंकडून विद्यावाणी रेडिओ केंद्रावरून उत्तरे दिली जाणार आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून लागू झाली असल्याने हा कार्यक्रम अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आचारसंहितेच्या काळात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याकडून लोकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी घेतले जाणारे लोकशाही दिन, तक्रार निवारण दिन असे कार्यक्रम तात्काळ स्थगित केले जातात. विद्यापीठाचे कुलगुरू देखील शासकीय यंत्रणेचा एक भाग असल्याने त्यांना देखील याच स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करता येणार नाही असे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.‘प्रश्न तुमचे उत्तर कुलगुरूंचे’ हा कार्यक्रम जर आचारसंहितेच्या नियमांमध्ये बसत नसेल तर तो प्रशासनाकडून घेतला जाणार नाही, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माध्यम समन्वयक अभिजित घोरपडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक