शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गसंवर्धन समिती कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:06 IST

हिंदवी स्वराज्याचे वैभव असलेले राज्यातील गडकोट आणि किल्ले यांचे जतन व संवर्धन व्हावे, या उदात्त हेतूने राज्य शासनाने २०१५ साली दुर्गसंवर्धन समितीची स्थापना केली. सुरुवातीचे दोन वर्षे या समितीचे कामकाज सुरळीत सुरू होते.

अभिजित कोळपे पुणे : हिंदवी स्वराज्याचे वैभव असलेले राज्यातील गडकोट आणि किल्ले यांचे जतन व संवर्धन व्हावे, या उदात्त हेतूने राज्य शासनाने २०१५ साली दुर्गसंवर्धन समितीची स्थापना केली. सुरुवातीचे दोन वर्षे या समितीचे कामकाज सुरळीत सुरू होते. मात्र मागील सहा महिन्यांपासून राज्याच्या पुरातत्त्व विभागाला पूर्णवेळ अधिकारी नसल्याने राज्याची दुर्गसंवर्धन समिती फक्त कागदावरच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे किल्ले संवर्धनाचे कामही ठप्प असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.३० मार्च २०१५ साली राज्य दुर्गसंवर्धन समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष हे राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर आणि पांडुरंग बलकवडे यांची नियुक्ती केली आहे. (निनाद बेडेकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे.) तसेच दुर्गसंवर्धनाचे वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्य करणाºया हृषीकेश यादव, राजेंद्र टिपरे, राजेंद्र शेळके, प्रमोद पाटील, भगवान चिले, वि. रा. पाटील,प्र. के. घाणेकर, सचिन जोशी, प्रफुल्ल माटेगावकर व संकेत कुलकर्णी असे इतर दहा सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. या समितीचा कालावधी एक-एक वर्षाचा ठरविण्यात आला आहे.२०१५ आणि २०१६ या दोन्ही वर्षी चांगले काम केल्याने समितीला मुदतवाढ दिली होती. दोन वर्षे हे काम सुरळीतपणे सुरू होते. मात्र चालू वर्षी २०१७ ला मात्र प्रमुख अधिकारी नसल्याचे कारण देत मागील सहा महिन्यांपासून या समितीने दिलेला मसुदा धूळखात पडून आहे. तसेच गड, किल्ल्यांच्या संंवर्धनाचे कामही ठप्प आहे. दोन वर्षांत या समितीच्या फक्त तीन बैठका झाल्या आहेत. प्रथम बैठक १९ आॅक्टोबर २०१६, तर दुसरी बैठक २ नोव्हेंबर २०१६ रोजी झाली. चालू वर्षी १४ मार्च २०१७ ला शेवटची बैठक झाली. त्यानंतर या समितीचा कालावधी पूर्ण झाला.मागील समितीमध्ये मी प्रमुख मार्गदर्शक होतो. त्यावेळी आम्ही समितीचा वर्षभरात करावयाचा मसुदा दिला आहे. त्यावर किती काम झाले. तसेच नवीन समितीबाबत कोणताही अध्यादेश किंवा होणाºया बैठकीसंबंधात मला अजून कोणत्याही (पत्र किंवा फोन) प्रकारचा निरोप आलेला नाही. त्यामुळे या समितीबाबत सद्यस्थिती काय आहे. याबाबत काहीच सांगता येणार नाही. राज्याच्या पुरातत्त्व विभागातर्फे कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत.- पांडुरंग बलकवडे,प्रमुख मार्गदर्शक, दुर्गसंवर्धन समितीमागील वर्षी आम्ही मुंबईला बैठकीला नियमित जात होतो. मात्र या वर्षी दुर्गसंवर्धन समिती अस्तित्त्वात आहे की नाही, याबाबत काहीच कल्पना नाही. आम्ही दिलेल्या मसुद्यावर काय काम झाले, त्याबाबतही राज्य पुरातत्त्व विभागाकडून आम्हाला काहीच कळविले जात नाही.- प्र. के. घाणेकर,सदस्य, दुर्गसंवर्धन समितीमागील काही महिन्यांपासून राज्य पुरातत्त्व विभागाला कोणी प्रमुख अधिकारी उपलब्ध नव्हता. त्यामुळे या समितीचे कामकाज ठप्प होते. मात्र नुकतेच राज्य पुरातत्त्व विभागाच्या प्रमुखपदी तेजस गर्गे यांची निवड झाली आहे. त्यामुळे या महिन्याच्या मध्यावर बैठक होणार असल्याचा निरोप मला मिळाला आहे. तसेच इतर सदस्यांनाही याबाबत कळवण्यात येणार आहे.- भगवान चिले,सदस्य, दुर्गसंवर्धन समिती