खळद : संपूर्ण देशात वेगवेगळ्या निवडणुकींसाठी एकाचवेळी एका मशिनमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवारांना मतदान करताना मत बाद होऊ नये, मतदारांच्यात जागृती व्हावी, उमेदवारांचे नाव, चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचावे, यासाठी उमेदवारांकडून मतदार जागृतीसाठी वापरल्या जाणाऱ्या डमी बॅलट मशिन बनविण्याची खळद येथे लगबग सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.खळद येथे खळद फाटानजीक चेतन रोहिदास रासकर या युवकाने अवघ्या १५ बाय २० च्या खोलीत पाच वर्षांपूर्वी हे मशिन बनविण्याचे काम सुरू केले आहे. देशभरात होणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकींसाठी आत्तापर्यंत लाखो मशिन त्याने बनवून दिल्या आहेत.सध्या देशभरात काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, तर महाराष्ट्रात महानगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. यामुळे मशिनला जास्त मागणी असून, गेल्या दीड महिन्यांपासून येथे रात्रंदिवस काम सुरू आहे. आत्तापर्यंत ३० हजार मशिनचा पुरवठा झाला आहे. तर आवश्यक वस्तूंचा तुटवटा होत असल्याने त्यांना मागणीएवढा पुरवठा करणे शक्य होत नाही. यामध्ये एक बटन, सोळा बटन अशा प्रकारात कागदी पेपर व प्लॅस्टिकमध्ये मशिन तयार केल्या जातात. मात्र, प्लॅस्टिक जास्त उपलब्ध होत नसल्याने कागदी पेपरच्या मशिन अधिक प्रमाणात बनविल्या जातात.या माध्यमातून येथील २० महिलांना व ५ पुरुषांना ऐन दुष्काळात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. तर यापुढे वेगवेगळ्या राज्यात होणाऱ्या निवडणुका पाहता दिवाळीपर्यंत मागणी अधिक राहणार असल्याचे रासकर याने सांगितले.
जागृतीसाठी डमी मतदान यंत्र
By admin | Updated: February 17, 2017 04:42 IST