निरवांगी : उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसेंदिवस निरवांगी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाणीपातळीमध्ये घट होत आहे. पाणी कमी पडू लागल्याने निरवांगी परिसरातील वाघाळ तलावात पाटब्ांधारे विभागाने पाणी सोडावे, अशी मागणी निरवांगीचे सरपंच दशरथ पोळ यांनी केली आहे.याबाबत पोळ म्हणाले, की निरवांगीनजीक वाघाळ तलाव आहे. या तलावानजीकच निरवांगी गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपच्ाांयतीची विहीर आहे. या विहिरीचा पाणीपुरवठा निरवांगी व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर दररोज केला जातो.परंतु सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. यामुळे विहिरीला पाणी कमी येऊ लागले आहे. परिणामी, गावाला पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सध्या निमगाव पाटबंधारे खात्याचे शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे. नीरा-डावा कालव्याच्या वितरीका क्र. ५७ मधून १४ क्रमांकाच्या उपकालव्यातून पाणी वाघाळ तलावात सोडण्यात यावे.वाघाळ तलावात पाणी सोडल्यास लगतच्या विहिरींना चांगल्या प्रकारे पाणी येत असते. यामुळे जूनपर्यंत पाण्याची टंचाई होणार नाही. टँकरची गरज भासणार नाही. शासनाच्या लाखो रुपयांचीही बचत होणार आहे. नागरिकांनाही वेळेत पाणी मिळेल. पाटब्ांधारे विभागाने उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता वाघाळ तलावात पाणी सोडावे,अशी मागणी करण्यात आली आहे. तलावाशेजारी मोठ्या प्रमाणात झाडी, शेती आहे. यामुळे या परिसरात पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. पाणी सोडल्यास पक्ष्यांचीही तहान भागणार आहे.(वार्ताहर)
विहिरीच्या पाणीपातळीत घट
By admin | Updated: February 13, 2017 01:23 IST