शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्तीमुळे वाघोलीत वाहतूककोंडी, राजकीय पुढाऱ्यांची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:10 IST

पुणे-नगर महामार्ग हा कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला महामार्ग आहे. कारण, काही वर्षांपर्यंत या महामार्गाला मृत्यूचा सापळा म्हणूनही संबोधले जायचे

वाघोली : पुणे-नगर महामार्ग हा कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला महामार्ग आहे. कारण, काही वर्षांपर्यंत या महामार्गाला मृत्यूचा सापळा म्हणूनही संबोधले जायचे. मात्र, याच मार्गावर आता नवीन समस्या उभी राहिलेली आहे, ती म्हणजे वाहतूककोंडीची. त्यामुळे वाहतूककोंडीचा महामार्ग असे नवीन नाव त्याला देण्यात आले आहे.

अरुंद चौक आणि रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहनांनी केलेले अतिक्रमण, व्यापाऱ्याची रस्त्यावर दुकानदारी व अपुरे पोलीस प्रशासन, राजकीय उदासीनता अशा परिस्थितीत वाघोलीमधील मुख्य रस्त्यावर बेशिस्त वाहतुकीमुळे मोठी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व महिलांसह वाहनचालकांना वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच, रस्त्यावर चालताना पादचाºयांना तारेवरची कसरत करावी लागते. या दैनंदिन बेशिस्त वाहतूककोंडीमुळे नागरिक वाहनचालक हैराण झाले आहेत. पुणे-नगर महामार्ग मराठवाडा, विदर्भाला जोडणारा असल्याने सतत वर्दळीचा आहे. वाहनांची संख्यादेखील मोठी असते. वाघोलीत मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या प्रमाणात आहेत. ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी ये-जा करीत असतात. या विद्यार्थ्यांनाही या बेशिस्त वाहतूककोंडीचा त्रास सोसावालागतो.

साईडपट्ट्या खराबपुणे-नगर रोडवरील खांदवेनगर ते आळंदी फाटा पर्यंतच्या रोडवरील दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या खराब होऊन मोठमोठे खड्डे तयार झालेले आहेत, तेही तत्काळ भरून घेणे गरजेचे आहे. तसेच पोलिसांनी विरुद्ध दिशेने येणाºया वाहनांवर रोज सकाळी व सायंकाळी कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.पोलीस बळ हे अपुरे नसून पुरेसे आहे. नुसत्या पोलिसांकडून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी बांधकाम विभागाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रोडच्या साईडपट्ट्यांची कामे झाली पाहिजेत. बाजूची अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे. तत्काळ सिग्नल चालू करण्यात येतील. रस्तावर पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल .- सुहास गरुड (उपविभागीय पोलीस अधीकारी हवेली )पोलिसांनी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बाजाराच्या दिवशी व्यापाºयाने रोडवर बसू नये; अन्यथा ग्रामपंचायीकडून त्याच्यावर आणि टेडंर घेणाºयावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अवैधरीत्या रोडवर, रोडच्या कडेला वाहन पार्किंग केल्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.- वसुंधराताई उबाळे(सरपंच वाघोली)

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडी