शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सुनेशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुतण्याचा खून, झगडेवाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:21 IST

आपल्या सुनेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून इस्त्रीच्या वायरने गळफास देऊन चुलत्याने आपल्या मुलाच्या मदतीने पुतण्याचा खून केल्याच्या तक्रारीवरून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : आपल्या सुनेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून इस्त्रीच्या वायरने गळफास देऊन चुलत्याने आपल्या मुलाच्या मदतीने पुतण्याचा खून केल्याच्या तक्रारीवरून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.सुभाष हरिदास झगडे, हरिदास निवृत्ती झगडे (दोघे रा. झगडेवाडी) अशी पिता-पुत्र असणा-या आरोपींची नावे आहेत. प्रशांत गोविंद झगडे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दि. १२ नोव्हेंबरला रात्री आठ ते दुसºया दिवशी पहाटे साडेपाच वाजण्याच्यादरम्यान प्रशांत याच्या राहत्या घरात घडलेल्या या प्रकाराबाबत प्रशांतची आई लता गोविंद झगडे हिने तक्रार दिल्याने उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.ठाणे अंमलदार अजीज शेख यांनी दिलेली माहिती अशी : फिर्यादीच्या शेजारी राहणारा तिचा थोरला दीर हरिदास झगडे यास फिर्यादीचा मुलगा प्रशांतचे त्याच्या सुनेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्याबाबत मुलाला समजावून सांग; अन्यथा त्याचा खून करेन, अशी धमकी त्याने फिर्यादीला दिली होती. झगडे यांनी स्वत:च्या मुलाला व आरोपीच्या सुनेला याबाबत समजावून सांगितले होते. आपला मुलगा लहान आहे. तसा काहीप्रकार होत असेल तर तो थांबवावा, असे सांगितले होते. तरीदेखील आरोपी प्रशांतला वेळोवेळी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत होता. दि. १२ नोव्हेंबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रशांत घरी आला. ढाब्यावर जेवण केल्याचे सांगून तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला.झगडे, तसेच त्यांचे पती यांनी जेवण केल्यानंतर त्यांच्या खोलीत झोपायला गेले. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झगडे यांना जाग आली. त्या वेळी प्रशांतच्या खोलीचा दरवाजा थोडासा उघडा असल्याचे त्याला दिसले. खोलीत डोकावल्यानंतर तिला घराच्या अँगलला बांधलेल्या इस्त्रीच्या वायरला प्रशांत लटकलेला दिसला. तिने केलेल्या आरडाओरडाकेल्यामुळे लोक जमले. त्यांनी प्रशांतला उतरवून जमिनीवर झोपवले. त्याला दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.आरोपी हरिदास व त्याचा मुलगा सुभाष अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रशांत झगडेवर चिडून होते. त्यांनी वेळोवेळी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्या दोघांनीच गळा आवळून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह इस्त्रीच्या वायरच्या सहाय्याने घराच्या पत्र्याच्या लोखंडी अँगलला अडकवून ठेवला. भीतीमुळे आपण तक्रार केली नव्हती, असे झगडे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा