शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे फळभाज्यांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:12 IST

पावसामुळे रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली.

पुणे : पावसामुळे रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. आवक आणि मागणी देखील चांगली असल्याने फळभाज्यांचे दर स्थिर होते. तर टॉमेटो, आले, भुईमुगाची आवक खूपच वाढल्याने दरामध्ये ५ ते १० टक्क्यांची घट झाली. मागणी वाढल्याने कोबी, घेवडा, तोतापुरी कैरीच्या दरामध्ये काही प्रमणात वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवार (दि.१७) रोजी सुमारे १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली.यामध्ये परराज्यातून हिमाचल प्रदेशमधून ३ ट्रक मटार, गुजरात, कर्नाटक येथून ६ ते ७ ट्रक कोबी, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकमधून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, तर इंदोर येथून ४ ते ५ टम्ेपो गाजराची आवक झाली.>मध्य प्रदेश आणि गुजरातमधून चार ते साडेचार हजार गोणी लसणाची आवक झाली. तर स्थानिक भागातून सातारी आले १७०० ते १८०० पोती, टॉमेटो ५ ते ६ हजार पेटी, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी १४ ते १५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गवार ८ ते १० टेम्पो, भेंडी १० ते १२ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, गावरान कैरी ८ ते १०, भुईमूग ३०० पोती, गाजर ३०० पोती, कांद्याची ७० ते ७५ ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची ४५ ट्रक इतकी आवक झाली.>फुलांचे दर स्थिरजिल्ह्यात पावसाने दिलेली उघडीप आणि अधिक महिना संपल्याने बाजारात फुलांची आवक वाढली आहे. मागणी साधारण असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांचे दर स्थिर आहेत. दरम्यान, यवत परिसरातून भाग्यश्री शेवंती बाजारात दाखल झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला भाग्यश्रीच्या प्रती किलोस १०० ते १८० रुपये भाव मिळाला आहे. रमजान ईदमुळे गेले दोन दिवस गुलछडी आणि मोगऱ्याला मागणी वाढून त्याच्या दरातही वाढ झाली होती, अशी माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.>पालेभाज्यांची तेजी कायममार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी पालेभाज्यांचीदेखील चांगली आवक होती. कोथिंबीरच्या तब्बल १ लाख जुड्यांची आवक झाली, तर मेथीच्या केवळ ३० हजार जुडी आवक झाली. अन्य भाज्यांची आवकदेखील सरासरी एवढीच होती. आवक वाढली तरी मागणीदेखील चांगली असल्याने पालेभाज्यांची तेजी कायम आहे. यामध्ये घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या प्रतिजुडीस ८ ते १५ रुपये, तर मेथीस ८ ते १५ रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात कोथिंबिरीची १० ते १५ व मेथीच्या जुडीची १५ ते २० रुपयांनी विक्री करण्यात येत होती. कांदापात १५ ते २० रुपये जुडी दर मिळाले, तर विलास भुजबळ याच्या गाळ्यावर मोठ्या प्रमाणात घोळाच्या भाजीची आवक झाली. घोळाच्या भाजीत कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असल्याने या भाजीला चांगली मागणी असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.>रमजान संपल्याने फळांची मागणी घटलीढगाळ वातावरण आणि रमजानचा महिना संपल्याने बाजारात सर्व प्रकारच्या फळांना मागणी घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने कलिंगड आणि पपईच्या दरात ५ टक्क्यांनी घट झाली आहे. तर, डाळिंबाच्या दरात १० टक्क्यांनी वधारले आहे. इतर फळांची आवक जावक कायम असल्याने दर स्थिर असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.दरम्यान, उन्हाळा संपल्याने सरबतविक्रेते, गुºहाळे तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबांना मागणी कमी होत असल्याने दरातही मोठी घट झाली आहे. रविवारी येथील फळबाजारात अननस ६ ट्रक, मोसंबी १५ टन, संत्री ५० ते ६० क्रेटस, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई ८ ते १० टेम्पोे, लिंबाची ५ ते ६ हजार गोणी, चिक्कू ४०० डाग, पेरु ५० क्रेटस,कलिंगड १० ते १५ टेम्पो, खरबुज १० ते १२ टेम्पो, सीताफळ १ टन, आंब्याची १५ ते २० टन इतकी आवक झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले.