शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रागाने पाहिल्याने कोयत्याने वार, वडगाव येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 03:23 IST

दुचाकीवरून जात असताना रागाने पाहिल्याच्या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी वडगाव बुद्रुक येथे घडला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून यातील पाच आरोपी अल्पवयीन आहेत.

पुणे : दुचाकीवरून जात असताना रागाने पाहिल्याच्या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी वडगाव बुद्रुक येथे घडला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून यातील पाच आरोपी अल्पवयीन आहेत.सौरभ लहू उंबरे (वय १८), सूरज युवराज शिंदे (वय १९), किसन चंद्रकांत कदम (वय १८), अविनाश मनोज ढेबे (वय १९), ओंकार भारत इनामिके (सर्व रा. सिंहगड रोड ) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच इतर पाच अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अजय वाघ (वय १८, रा. वडगाव बु) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यामुळे दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. विनोद फड याने भांडणे मिटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी तेथून निघून गेले. मात्र काही वेळातच आपल्यासोबत आणखी मित्रांना घेऊन येत गणेश म्हसकर याला मारहाण केली. त्यावेळी अजय यांचा मित्र विजय चिंचवडकरसुद्धा तेथे आला होता.घाबरल्यामुळे अजय तेथून पळून जात असताना आरोपींनी अजयच्या पाठीत कोयत्याने वार केले. तसेच विनोदच्याही डोक्यात कोयत्याने वार केले. विनोदने अडवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्या हातावर तसेच मनगट व पायाच्या नडगीवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच मारुती व्हॅनच्या काचा फोडून गाडीचे नुकसान करून आरोपी पळून गेले.या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यात नक्की कोणामुळे भांडणे सुरू झाली याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. एम. साळुंखे यांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अजय त्याचा आतेभाऊ विनोद फड, मित्र गणेश म्हसकर यांच्यासोबत विनोदच्या व्हॅनमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपींपैकी तिघे दुचाकीवरून जात असताना अजय व त्यांच्या मित्राकडे पाहत होते. त्यावेळी अजय व त्याचे मित्रसुद्धा आपल्याकडे बघत असल्याचा आरोपींना राग आला.आरोपींनी गाडी वळवून अजय व त्याचे मित्र बसलेल्या व्हॅनजवळ येत त्यांना धमकी दिली. तुम्हाला मस्ती आली आहे का? आम्हाला खुन्नस देता, असे म्हणत फिर्यादी व त्याच्या मित्रांना शिवीगाळ केली.

टॅग्स :Crimeगुन्हा