शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

एनआरसी-सीएएमुळे धास्तावलेल्या मुस्लिमांची जन्म-मृत्यू कार्यालयात गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:34 IST

केंद्र शासनाने नागरिकत्व कायदा आणल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. पुण्यामध्येही पुरोगामी संघटनांसह मुस्लिम समाजाने आंदोलनाद्वारे आपला निषेध नोंदविला आहे. परंतू, ‘एनआरसी-सीएए’मुळे धास्तावलेल्या मुस्लिम नागरिकांनी ‘जन्म-मृत्यू’ कार्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देमहापालिका हैराण : दाखले मिळविण्याकरिता धांदलकाही जणांची रजिस्टरवर नोंद आढळत नसल्याने वादाचे प्रसंग

लक्ष्मण मोरे पुणे : केंद्र शासनाने नागरिकत्व कायदा आणल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. जागोजाग आंदोलने आणि निषेध करण्यासोबतच हा कायदा लागू न करण्याची मागणीही केली जात आहे. पुण्यामध्येही पुरोगामी संघटनांसह मुस्लिम समाजाने आंदोलनाद्वारे आपला निषेध नोंदविला आहे. परंतू, ‘एनआरसी-सीएए’मुळे धास्तावलेल्या मुस्लिम नागरिकांनी ‘जन्म-मृत्यू’ कार्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.केंद्र शासनाने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हा कायदा मंजूर करुन घेतल्यानंतर विविध राज्यांनी त्याविरोधात भूमिका घेतली आहे. सध्या दिल्लीतील शाहिन बागचे आंदोलनही चर्चेचा विषय ठरलेले आहे. देशभरात मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाने बाहेर पडून आंदोलनात भाग घेतला. पुण्यामध्येही विविध मोर्चे, धरणे आंदोलने झाली. या देशामधून आपल्याला बाहेर जावे लागेल अशी भिती मुस्लिम समाजातील नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा नागरिकत्व सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा आपल्याकडे शासकीय कागदपत्रं असावीत. आपल्यासह आपल्या नातलगांच्या जन्म आणि मृत्यूचे दाखले आपल्याकडे असावेत यासाठी मुस्लिम नागरिकांनी  ‘जन्म-मृत्यू’ कार्यालयात गर्दी करायला सुरुवात केली आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे ‘जन्म-मृत्यू’ कार्यालय कसबा पेठेत आहे. या कार्यालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून हे दाखले मिळविण्याकरिता मोठी गर्दी होऊ लागली आहे. नागरिकांकडून सातत्याने दाखल्यांची मागणी होऊ लागल्याने कामाचा ताण वाढला आहे. अधिकाºयांसह कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने दाखले मिळण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे नागरिकांची चिडचिड होत आहे. त्यांच्या रोषाचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता या नागरिकांसाठी दिवसभरातील एक विशिष्ठ वेळ ठरवून दिली जाणार असून त्या वेळेत दाखले दिले जाणार आहेत.पालिकेकडे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमधील जन्म आणि मृत्यूच्या नोंदी येतात. त्यानुसार, पालिका त्याची नोंद अभिलेखावर करते. गेल्या काही वर्षांपासून ही प्रक्रिया संगणकिय प्रणालीद्वारे होत आहे. परंतू, संगणकीय प्रणाली येण्यापुर्वी रजिस्टरवर नोंदी ठेवल्या जात होत्या. दाखले देण्याकरिता रजिस्टरवर नोंद असणे आवश्यक आहे. हे रजिस्टर बाईंड तसेच स्कॅनिंग करुन ठेवलेले आहे. यासोबतच समाविष्ठ अकरा गावांमधील जन्म-मृत्यूच्या नोंदीची पालिकेकडे आहेत. परंतू, काही जणांची रजिस्टरवर नोंद आढळत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.गेल्या महिन्यात अवघ्या काही शेकड्यांमध्ये मागितल्या जाणाऱ्या दाखल्यांचे प्रमाण एकदम हजारोंच्या घरात पोचला आहे. पालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जमा होणारे अर्ज कसबा पेठ जन्म-मृत्यू कार्यालयामध्ये जमा होतात. या अर्जांची संख्या मागील तीन आठवड्यात वाढल्याने पालिकेचेही  ‘टेन्शन’ वाढले आहे. 

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMuslimमुस्लीमPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका