शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल

By admin | Updated: March 27, 2017 02:04 IST

कांदा हे नगदी पीक असल्याने छोटा-मोठा शेतकरी शक्यतो हेच पीक घेतो. कांदा हा कधी शेतकऱ्यांना हसवतो तर

नारायणपूर : कांदा हे नगदी पीक असल्याने छोटा-मोठा शेतकरी शक्यतो हेच पीक घेतो. कांदा हा कधी शेतकऱ्यांना हसवतो तर कधी रडवतो. सध्या कांद्याचे बाजारभाव गडगडले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अगदी हवालदिल झाला आहे.उदाचीवाडी (ता.पुरंदर) येथील शेतकरी काका ज्ञानदेव कुंभारकर व कुंडलिक मेमाणे यांनी यावर्षी त्यांच्या सव्वा एकर क्षेत्रात कांद्याचे पीक घेतले. अगदी लहान मुलांना जपावे तसे पिकाला जपले. अगदी लागवडीपासून शेत तयार करण्यासाठी, कांद्याची रोपे, कांद्याची लागवड करण्याची मजुरी, विविध तणनाशके, औषधाचा खर्च, विकतचे पाणी चार वेळा घेतले, एका वेळच्या पाण्याला १७०० ते १८०० रु. खर्च होत होता. त्यानंतर खुरपणी, वीजबिल व इतर खर्च मिळून ४७ हजार रुपये खर्च झाला. त्यांनतर कांदाकाढणी मजुरी, कांदा बारदाणा पिशवी जवळपास ८ हजार रु. खर्च, वाहतूक खर्च वेगळाच. शिवाय घरच्या माणसांची मजुरी यात धरली नाही, असे काका ज्ञानदेव कुंभारकर यानी सांगितले. कोल्हापूर मार्केट येथे कांदा विक्रीसाठी नेण्यात आला. मात्र बाजारभाव मिळाला १०० किलोस ४५० ते ५२० रु.,हाती आले ४७ हजार आणि खर्च झालाय काढणीपूर्वी ४८ हजार रुपये. कांदा बारदाणा पिशवी जवळपास ८ हजार रु. खर्च, गाडीभाडे विकतच्या पाण्याचे ७२०० आणि घरच्या माणसांची मजुरी धरलीच नाही. म्हणजे सरसरी २१ हजार रुपयांच्यावर तोटा झाला आहे. हे एवढे मोठे नुकसान कधीच भरून न निघणारे आहे. पाणी नाही म्हणून शेतात नवीन विहीर खोदली, लाखो रुपये खर्च झाला, मात्र पाणी काही लागलेच नाही. विहिरीला जवळपास ७ लाख रुपये खर्च केला असल्याचे कुंडलिक मेमाणे यांनी सांगितले. कांद्याला सरकारने हमीभाव द्यावा तरच छोटा कांदा उत्पादक शेतकरी जगेल. नाहीतर आता विदर्भ, मराठवाडासारख्या पश्चिम महाराष्ट्रातही आत्महत्या होतील. सरकारने कांद्याच्या दरात हमीभाव द्यावा, ही शेतकऱ्यांची मागणी आहे.