शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत पाहणी - निवाराशेडअभावी विद्यार्थी, प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:36 IST

देहूरोड-निगडी रस्ता : महामार्ग चौपदरीकरणानंतरही दुर्लक्ष

देहूरोड : पुणे-मुंबई महामार्गाचे देहूरोड ते निगडी दरम्यानच्या रस्त्याचे सहा महिन्यांपूर्वी चौपदरीकरण पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली आहे. मात्र महामार्गाचे चौपदरीकरण करताना विविध बसथांब्यांवरील काढलेले निवारा शेड पूर्ववत उभारण्यात आले नसल्याने परिसरातील प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याच्या कडेला उन्हातान्हात थांबून बसची वाट पाहावी लागत आहे. निवारा शेड उभारण्यास आणखी किती दिवस लागणार, असा सवाल प्रवासी व विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळील कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्द ते देहूरोड पोलीस ठाण्याजवळील सेंट्रल चौक दरम्यानच्या रस्त्याचे सव्वासहा किलोमीटर (किमी २०.४०० ते किमी २६.५४०) लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण कामाचे आदेश मुंबई येथील एका कंत्राटदारास डिसेंबर २०१६ मध्ये देण्यात आल्यानंतर संबंधित रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. रस्त्याचे निर्धारित वेळेत जून २०१८ मध्ये चौपदरीकरण झाले आहे. रुंदीकरण झालेल्या भागातून वाहतूक सुरूझाली आहे. देहूरोड ते निगडी दरम्यानच्या भागातील रुंदीकरण करताना विविध ठिकाणी बसथांब्यांवर असलेले निवारा शेड काढण्यात आले होते. रस्त्याचे काम होऊन सहा महिने उलटूनही संबंधित ठिकाणी पुन्हा शेड उभारण्याकडे महामंडळाचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.संत तुकाराममहाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी देहूरोड वीरस्थळाजवळ निवारा शेड नसल्याने गैरसोय होत आहे. महामार्गालगत विद्यार्थी व प्रवासी बसची वाट पाहत धोकादायकरीत्या उभे राहत आहेत. त्यामुळे देहूरोड ते निगडी दरम्यानच्या रस्त्यालगत दोन्ही बाजूंना बसथांब्यांवर निवारा शेड उभारून गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. देहूरोड ते निगडी दरम्यान बस थांब्यांवर निवारा शेड उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. कृष्णा दाभोळे, महिलाध्यक्षा शीतल हगवणे, जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब जाधव, धनंजय सावंत, भाजपाचे सूर्यकांत सुर्वे, शिवसेनेचे संघटक संदीप गोंटे यांनी रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे.लवकरच होणार कामास सुरुवातदेहूरोड ते निगडी दरम्यान विविध ठिकाणी बसथांब्यांवर निवारा शेड पूर्ववत उभारण्यासाठी रस्त्याचे काम करणाºया संबंधित कंत्राटदारास सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही काम सुरु झाले नसल्याने माहिती घेण्यात येत आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याबाबत पुन्हा सूचना देण्यात येणार आहेत. त्यानंतर तातडीने कामे सुरू होतील.- संजय गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ, मुंबई

 

टॅग्स :Puneपुणे