शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी भाताच्या लावण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST

भोर : जूनच्या मध्यावधीनंतर पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे ...

भोर : जूनच्या मध्यावधीनंतर पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे लागवडीला सुरुवात केली. मात्र, मागील आठवडाभरापासून पावसाने ओढ दिल्याने भाताच्या लावण्या रखडल्या आहेत.

भोर तालुक्यात पश्चिम व पूर्व असे दोन भाग पडत असून पश्चिम भागात नीरा देवघर धरण भागातील हिर्डोशी खोरे तर भाटघर धरण भागातील भुतोंडे व वेळवंड खोऱ्यात महुडे खोरे आंबवडे खोरे भागात दरवर्षी वळवाचे पाऊस झाल्यावर धूळवाफेवर भात पिकाची पेरणी करतात. १२ जूननंतर झालेल्या पावसामुळे भाताच्या बियाणांची उगवण चांगली झाली होती त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील नीरा देवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यातील शेतकरी भाताच्या लागवडीला सुरवात केली होती. मात्र आठवड्यापासून पाऊस गायब झाला असून चक्क ऊन पडले आहे. त्यामुळे भाताच्या लागवडी रखडल्या आहे. लावलेले भात वाळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

पूर्व भागातील पुणे सातारा महामार्गावरील आजूबाजूची गावे, भोंगवली भागातील गावे, वीसगाव खोरे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर जमिनीला चांगला वाफसा आल्यावर भाताच्या बियाणांची पेरणी केली असून भाताच्या

रोपांची उगवण झाली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर भाताची लागवड करतात. मात्र सध्या पाणी नसल्याने माळरानावरील तरवे करपू लागले आहेत. भातलावणी पावसाआभावी रखडली असून लावलेले भात आणि भाताचे तरवे पाणी नसल्यामुळे सुकू लागले आहेत. पावसाची अशीच अवस्था राहिल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढू शकते, अशीच स्थिती आहे

इंद्रायणी तांदळाला सर्वाधिक मागणी

तालुक्यात खरीप पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर आहे. भात हे प्रमुख पीक असून सुमारे सात हजार ४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. ५० हेक्टरवर भाताच्या रोपांची पेरणी केली होती. हळव्या आणि गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जात असून, गरव्या जातीत इंद्रायणी, बासमती आंबेमोहर, पुसा बासमती, तामसाळ, हळवेबारीक या जाती, तर हळव्या जातीत रत्नागिरी २४, कर्जत १८४, सोनम, इंडम, फुले, राधा या जातीच्या भाताची लागवड केली जाते. हळव्या जातीचे भातपीक ९० ते १०० दिवसांत तयार होते आणि त्याला पाणी कमी लागते. तर गरव्या जातीचे भात १०० ते १२० दिवसांत तयार होते. त्याला पाणी अधिक प्रमाणात लागते. तालुक्यात इंद्रायणी जातीच्या तांदळाला सर्वाधिक मागणी असून तालुक्यात ८० ते ९० टक्के इंद्रायणी भाताचीच सर्वाधिक लागवड केली जाते.

०२ भोर

भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यात भाताच्या लागवडी रखडल्या.