शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनांची पूर्तता न झाल्याने धनगर समाज सरकावर नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 03:48 IST

धनगर समाजाला एस. टी. संवर्गाचे आरक्षण मिळावे व सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, या प्रमुख्य मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत.

पुणे : धनगर समाजाला एस. टी. संवर्गाचे आरक्षण मिळावे व सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, या प्रमुख्य मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे धनगर समाज केंद्र व राज्य शासनावर नाराज आहे, अशी कबुली जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली.पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंती महोत्सव समितीच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. ते म्हणाले, धनगर समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (बार्टी) अहवाल धनगर आरक्षणाच्या विरोधी येत होता. बार्टीचा अहवाल दोन वेळा विरोधी आल्यामुळे शासनाने ‘टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस’च्या (टीआयएसएस) सर्वेक्षण समितीकडे अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली. या समितीचा अहवाल धनगर समाजाच्या बाजूने येईल, अशी आमची अपेक्षा आहे. एकदा मंत्रीमंडळ बैठकीत सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा विषय चर्चेसाठी आला होता. मात्र, त्यावर काही मतमतांतरे समोर आल्यामुळे उपसमिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीकडूनही अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल.