शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

प्रशासनाच्या करवाढीवर स्थायी समितीची कु-हाड, पुणेकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 03:25 IST

प्रशासनाने सुचवलेली घरपट्टीतील १५ टक्के वाढ ब-याच चर्चेनंतर अखेर स्थायी समितीने फेटाळली. थकबाकी वसुलीवर भर देण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली. त्याचबरोबर दंडात सवलत देण्याविषयी काही करता येईल का, तशी अभय योजना महिनाभरासाठी आणता येईल का, यावरही विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे - प्रशासनाने सुचवलेली घरपट्टीतील १५ टक्के वाढ बºयाच चर्चेनंतर अखेर स्थायी समितीने फेटाळली. थकबाकी वसुलीवर भर देण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली. त्याचबरोबर दंडात सवलत देण्याविषयी काही करता येईल का, तशी अभय योजना महिनाभरासाठी आणता येईल का, यावरही विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रशासनाच्या या करवाढीला समितीच्या सर्वच सदस्यांनी तीव्र विरोध केला. सुरुवातीला आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना त्यासाठी तयार केले होते. १५ टक्के नाही तर १० टक्के तरी करवाढ करावी, या आयुक्तांच्या मागणीला स्थायी समिती सदस्य, तसेच पक्षनेत्यांनी मान्यता दर्शवली होती. मात्र पडद्याआड अनेक हालचाली झाल्या व अखेर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला करवाढ मागे घेण्याचा निर्णय घ्यावाच लागला. ते नाहीत म्हटल्यावर समितीमधील अन्य पक्षांच्या सदस्यांनीही करवाढ नकोच, असे मत व्यक्त केले व ही करवाढ फेटाळली गेली.स्थायी समिती अध्यक्ष मोहोळ यांनी करवाढ फेटाळली असल्याची माहिती दिली. मिळकत कराची सुमारे २ हजार ४०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात तब्बल १ हजार २०० कोटी रुपये तर फक्त दंडाचीच रक्कम आहे. दंडाच्या रकमेत काही सवलत जाहीर केली तर त्यातून किमान ३०० ते ४०० कोटी रुपये वसूल होऊ शकतात. त्याप्रमाणे योजना तयार करून समितीला देण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे, असे मोहोळ म्हणाले.पाणीपट्टीचीही ५०२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात अनेक बडे लोक आहेत. त्यांनी न्यायालयात दावे केले आहेत. त्यांच्यासाठी लोकअदालतीसारखे उपक्रम घ्यावेत व त्यातून तडजोड करून वसुली करावी, अशी सूचना समितीमधील काही सदस्यांनी केली असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.पाणीपट्टीमध्ये गेल्या ३ वर्षांपासून दरवर्षी ५ टक्के वाढ होत आहे. आणखी १० वर्षे ती होणार आहे, मात्र ज्यासाठी ही वाढ केली ती पाणी योजना अजूनही सुरू झालेली नाही, याकडे काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप बराटे व प्रिया गदादे यांनी थकबाकी वसूल झाल्याशिवाय कोणतीही करवाढ करू नये, असे पत्रच मोहोळ व आयुक्तांना दिले.करवाढीला सर्वच सदस्यांनी विरोध केला. आयुक्तांनी करवाढीतून १३५ कोटी रुपये जास्तीचे जमा बाजूस गृहित धरले आहेत. ते पैसे जमाच होणार नसल्याने आता त्यांचे अंदाजपत्रक तेवढ्या रकमेने गडगडले आहे. ती तूट थकबाकी वसुलीतून भरून काढण्याचे ठरवण्यात आले. समिती सदस्यांनी अंदाजपत्रकात बदल करण्याचे सर्व अधिकार मोहोळ यांच्याकडे दिले आहे. आता समितीचे अंदाजपत्रक लवकरच सर्वसाधारण सभेला सादर करण्यात येईल.

टॅग्स :Puneपुणे