शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

तुषारच्या गोलमुळे आलेगावकर संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 02:05 IST

शालेय हॉकी स्पर्धा : सेंट जोसेफ बॉईज १४ वर्षांखालील गटात अजिंक्य

पुणे : तुषार गायकवाडने नोंदविलेल्या एकमेव गोलच्या जोरावर आलेगावकर हायस्कूल संघाने आंतरशालेय १७ वर्षांखालील मुलांच्या हॉकी स्पर्धेत सेंट जोसफ, खडकी संघाचा अंतिम सामन्यात पराभव करून विजेतेपद जिंकले. दुसरीकडे १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट जोसेफ बॉईज स्कूल संघाने मॉडर्न हायस्कूल संघाला नमवित विजेतेपदावर आपला हक्क प्रस्थापित केला.

जिल्हा क्रीडा परिषद व शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने शिवछत्रपती क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील वरील अंतिम सामन्यात आलेगावकर हायस्कूल संघाने सेंट जोसेफ, खडकी संघाचा १-० गोलने पराभव केला. सुरुवातीपासून आलेगावकर संघाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच जदल व आक्रमक खेळ करीत वर्चस्व राखले. आलेगावकर संघाच्या तुषार गायकवाडला त्याचा सहकारी विनायक बिरंजेकडून १८ मिनिटाला मिळालेल्या पासचा पूर्ण फायदा घेत आपल्या संघाचा एकमेव केला.तत्पूर्वी, उपांत्यफेरीतच्या पहिल्या सामन्यात आलेगावकर हायस्कूल संघाने सेंट पेट्रिक्स हायस्कूल संघाचा ७-० तर सेंट जोसेफ, खडकी संघाने विद्याभवन हायस्कूल संघाचा १-० गोलने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तृतीय क्रमांकाच्या लढतीत विद्याभवन संघाने सेंट पेट्रिक्स संघाला १-० गोलने नमविले. विजयी संघाकडून अनिरुद्ध भोसलेने एकमेव गोल केला.दुसरीकडे १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट जोसेफ बाईज स्कूल संघाने मॉडर्न हायस्कूल संघाचा ३-० गोलने पराभव करीत जेतेपद जिंकले. विजयी संघाकडून शिवम पाटीलने ७ व १९ व्या मिनिटाला असे दोन, केदार चव्हाणने २३ व्या मिनिटाला एक गोल केला. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत सेंट जोसेफ बॉईज स्कूल संघाने डॉ. झाकिर हुसेन स्कूल संघाला १-० तर मॉडर्न संघाने सेंट पेट्रिक्स संघाला २-० गोलने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या वयोगटात तृतीय क्रमांकाच्या सामन्यात सेंट पेट्रिक संघाने डॉ. झाकिर हुसेन स्कूल संघाला ३-१ गोलने नमविले. विजयी संघाकडून १० व्या मि. आशिष गायकवाड, १८ व्या मि. प्रेम चांदने व २० व्या मि. हृषीकेश जाधवने प्रत्येकी एक गोल केला. पराभूत संघाकडून २३ व्या मि. केदार चव्हाणने एक गोल केला.

टॅग्स :Puneपुणे