शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या संपामुळे ससूनमधील रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 03:54 IST

विद्यावेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयातील असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेच्या (अस्मी) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

पुणे - विद्यावेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयातील असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेच्या (अस्मी) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे रुग्णांचे काही प्रमाणात हाल होत आहेत. परंतु, रुग्णांच्या जीविताला धोका पोहोचू नये; याची काळजी घेत असल्याचा दावा आंदोलक डॉक्टरांनी केला आहे. दरम्यान, इंटर्न डॉक्टरांनी रक्तदान शिबिर आयोजित करून अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध व्यक्त केला.एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना प्रत्येक विद्यार्थ्याला सहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. मात्र, वाढत्या महागाईच्या तुलनेत दिले जाणारे विद्यावेतन कमी आहे. त्यामुळे संघटनेने विद्यावेतनाच्या रकमेत वाढ करावी; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला होता. शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला, असे बी. जे. मेडिकल महाविद्यालयातील डॉ. केतन देशमुख यांनी सांगितले.काम बंद आंदोलनातून तातडीच्या सेवा वगळता इतर सर्व ठिकाणांवरील प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी झाले होते. त्यामुळे बाह्यरुग्ण विभाग, वॉर्ड, कॅथलॅब, रक्तपेढी येथील कामकाजांवर परिणाम झाला. प्रामुख्याने रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेणे, रुग्णाच्या आजारांच्या नोंदी घेणे ही कामे प्रशिक्षणार्थी डॉक्टर करतात. मात्र, काम बंद आंदोलनामुळे ही कामे निवासी डॉक्टरांना करावी लागत आहेत. परिणामी रुग्णसेवेच्या कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होत आहे. दरम्यान, शासनाकडून लेखी आश्वासन प्राप्त झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे.डॉ. केतन देशमुख म्हणाले, की राज्य शासनाने २०१२मध्ये विद्यावेतनामध्ये वाढ केली. त्या वेळी वाढत्या वैद्यकीय शिक्षण विभागाने ११ हजार वेतन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यासंदर्भात पाठपुरावा करूनही त्यात वाढ करण्यात आली नाही. मानधनवाढीबरोबरच वसतिगृहाबाबत प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे अनेक प्रश्न आहेत. विद्यावेतनामध्ये १५ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात यावी, यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.गेल्या महिन्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले होते. परंतु, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती असोसिएशनचे मुंबईतील जनरल सेक्रेटरी डॉ. गोकूळ राख यांनी दिली.ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नाही. तसेच पॅरामेडिकल आणि निवासी डॉक्टरांनी सर्व बाजू सांभाळून घेतली आहे.

टॅग्स :docterडॉक्टरPuneपुणे