शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या दुर्दशेमुळे जिल्ह्यात वाढले अपघातांचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 02:20 IST

सासवडमध्ये एक ठार : पुणे-नाशिक महामार्गावर २ वाहने उलटली

सासवड : सासवड-जेजुरी रोडवरील वीर फाट्यावर २६ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या दरम्यान झालेल्या अपघातात परिंचे येथील तरुण स्वप्निल वसंत दुधाळ (वय ३०) हा जागीच ठार झाला. सोमनाथ मारुती दुधाळ हा त्याचा चुलतभाऊ गंभीर जखमी झाला आहे. याची फिर्याद लहू महादेव दुधाळ (रा. परिंचे) यांनी सासवड पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलिसांच्या वतीने सुरू आहे.

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या दरम्यान सासवड-जेजुरी मार्गावरील वीर फाटा येथे ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील स्वप्निल वसंत दुधाळ (वय ३०) हा जागीच ठार झाला. त्याचा चुलत भाऊ सोमनाथ मारुती दुधाळ (वय ४२) हा गंभीर जखमी झाला आहे .दोघेही परींचे तालुका पुरंदर येथील रहिवाशी असून सासवड येथील एका पेट्रोल पंपावर कामाला होते. त्यांची कामावरील सुट्टी झाल्यानंतर मोटरसायकल (नंबरएम एच. १२-एनएच ९४९८) वरून दोघेही घरी निघाले असताना वीर फाटा येथे माल ट्रक (एमएच 0४-जीआर-३५४१)ने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात स्वप्निलचा जागीच मृत्यू झाला. खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले अधिक तपास पोलिसांच्या वतीने सुरू आहे.कळंब व एकलहरे हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर २ वाहने वेगवेगळ्या ठिकाणी उलटली आहेत. अपघातात जीवितहानी झाली नाही.याबाबत माहिती पुढीलप्रमाणे घोडनदीवरील पुलाच्या पुढील बाजूस सकाळी साडेसहा वाजता आर. आर. रोडवेज प्रा. लि., कंपनीची मालवाहतूक गाडी उलटली. मुंबई येथील कंपनीतून टाटा मोटर्स कंपनीला पुण्याला माल घेऊन जाणारा कंटेनर (एमएच ४६ एच ३३५०) पुढील वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे उलटला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु चालक मानकू यादव जखमी झाला असून मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत.

ही घटना घडल्यानंतर त्याने दुसरा सहकारी मकसूद आलम याला फोनवरून गाडी उलटल्याची माहिती देत असतानाच त्याची गाडी उलटली.चौधरी ढाब्याजवळ कंटेनर (एमएच ४६ एआर ७५८०) उलटला. या दोन घटनांमध्ये एक किलोमीटरचे अंतर असल्याचे दिसून आले. यामध्ये चालक मकसूद आलम यालासुद्धा किरकोळ दुखापत झाली असून याच्याबरोबर असणारे सहकारी सलमान अन्सारी व काबीलमियाँ हेसुद्धा जखमी झाले आहेत.जिल्ह्यातील पुणे-नाशिक तसेच पुणे-सातारा , पुणे-सोलापूर, पुणे-नगर या मार्गांची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.