शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दरडी कोसळल्याने आहुपे खोऱ्याशी संपर्क तुटला

By admin | Updated: June 30, 2017 03:34 IST

भीमाशंकर-पाटण खोऱ्याची नाळ आहुपे खोऱ्याशी जोडणारा कुशिरे-भोईरवाडी रस्त्यावर नागमोडी वळणे असणाऱ्या घाटामध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कतळेघर : भीमाशंकर-पाटण खोऱ्याची नाळ आहुपे खोऱ्याशी जोडणारा कुशिरे-भोईरवाडी रस्त्यावर नागमोडी वळणे असणाऱ्या घाटामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने भीमाशंकर-पाटण खोऱ्याचा आहुपे खोऱ्याशी संपर्क तुटला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर-पाटण व आहुपे खोऱ्यामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भीमाशंकर व पाटण ही दोन खोरी तिसऱ्या असणाऱ्या आहुपे खोऱ्याशी जोडणाऱ्या कुशिरे-भोईरवाडी रस्त्यावर असणाऱ्या अतिशय अवघड अशा या नागमोडी वळणाच्या घाटामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्यामुळे हा घाट अक्षरश: धोकादायक बनला आहे. घाटाच्या कडेला असणाऱ्या डोंगरावरचे मोठमोठाले दगड व माती रस्त्यावर आल्यामुळे आहुपे खोऱ्याचा भीमाशंकर व पाटण खोऱ्याशी येणारा संपर्क तुटला आहे. आहुपे खोऱ्यातील गावे ही अतिशय डोंगर-दऱ्या खोऱ्यांमध्ये वसली आहेत. या भागामध्ये कोणत्याही सोईसुविधा नसल्यामुळे या भागातील आदिवासी जनतेला भीमाशंकर खोऱ्यामध्ये नेहमीच यावे-जावे लागते. आहुपे भागातील आदिवासी बांधवांची नेहमीच पाटण व भीमाशंकर परिसरामध्ये दररोजची वर्दळ आहे. आहुपे खोऱ्यातील आहुपे, पिंपरगणे, अघाणे, तिरपाड, नानवडे, कोंढरे, भोईरवाडी या गावांतील आदिवासी बांधवांना आठवडे बाजार, आजारी पडल्यानंतर दवाखाना, या भागातील आदिवासी मुलांना शिक्षणासाठी भीमाशंकर खोऱ्यामध्ये यावे लागते. यांना येण्या-जाण्यासाठी कोंढरे-भोईरवाडी मार्गे कुशिऱ्यामध्ये येऊन म्हाळुग्यांमार्गी तळेघरला यावे लागते. याच रस्त्यावरती असणाऱ्या कुशिरे भोईरवाडीदरम्यान असणाऱ्या अतिशय नागमोडी वळणे असणाऱ्या घाटामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून मोठमोठाले दगड रस्त्यावर आल्याने बऱ्याच वेळा वाहतूक बंद होऊन या दोन्ही खोऱ्यांचा संपर्क तुटला जातो. आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. प्रशासनाने याची दखल घेत तत्काळ या घाटाची रुंदी वाढवून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते रमेश लोहकरे, कुशिऱ्याचे उपसरपंच दिलीप मुदगुण, उपायुक्त खेवजी भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव घोईरत यांनी केली आहे.