शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

नोटबंदीमुळे जमीन खरेदी-विक्री व्यवहारात घट

By admin | Updated: November 17, 2016 03:36 IST

केंद्र शासनाच्या नोटबंदीचा परिणाम जमीन खरेदी-विक्रीवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे हिंजवडीतील दुय्यम निबंधक कार्यालयात पाहायला मिळत आहे.

हिंजवडी : केंद्र शासनाच्या नोटबंदीचा परिणाम जमीन खरेदी-विक्रीवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे हिंजवडीतील दुय्यम निबंधक कार्यालयात पाहायला मिळत आहे. जमीन खरेदीविक्री व दस्त नोंदणीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. यामुळे गुंठेवारी करून मालामाल झालेले, तसेच जमीन खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या मध्यस्थांचे धाबे दणाणले आहे. आपल्याकडील काळा पैसा कशा प्रकारे लपवावा याची चिंता कार्यालयाच्या परिसरात होत आहे. आयटी पार्क, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांची हद्द जवळ असल्याने हिंजवडीसह परिसरात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदीविक्री केली जात आहे. माण, मारुंजी, नेरे, कासारसाई, जांबे परिसरात गुंठेवारी वाढली आहे. यामुळे पडेल त्या किमतीत या ठिकाणी प्लॉट मिळवण्यासाठी गुंतवणूकदार तयार असतात. यातच हा परिसर महापालिकेत समाविष्ट होणार असल्याची चर्चा असल्याने येथील जमिनीच्या किमती अधिक वाढल्या आहेत. यातूनच काळ्या पैशांची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होताना दिसते. हिंजवडीतील रहिवासी क्षेत्रातील जागेचा भाव २५ लाखापर्यंत असून, इतर क्षेत्रासाठी १५ ते २० लाखांपर्यंत आहे. परंतु सरकारी दप्तरी मात्र रहिवासी क्षेत्राचा दर ८ लाख ३९ हजार, तर शेती ना विकास दर ७ लाख २७ हजार रुपये दाखवला जातो. प्रत्यक्ष व्यवहार करताना सरकारी मूल्यांकनाप्रमाणे जमिनीची किंमत दाखवून मुद्रांक शुल्क आकारून व्यवहार पूर्ण केला जातो. इतर रक्कम रोख स्वरूपात घेतली जाते. यातूनच कोट्यवधींचा व्यवहार येथे होत असतो. सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे अशा व्यवहारावर पूर्णपणे आळा बसला आहे. परिणामी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात शुकशुकाट आहे. रोजच्या प्रमाणात येथील व्यवहार जवळपास ८० टक्क्यंहून कमी झाले आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिक व्ही. व्ही. तपस्वी यांनी सांगितले की, शासनाच्या या निर्णयाचा परिणाम येथील व्यवहारावर निश्चित झाला असून, पुढील काळातही याचा परिणाम राहणार आहे. जमिनीच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळालेल्या विक्रेते व शेतकऱ्यांची देखील यामुळे बिकट अवस्था आहे. (वार्ताहर)