शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

डीएसके यांची आता ईडीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 21:19 IST

ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांची चौकशी सुरू आहे. 

पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांची चौकशी सुरू आहे. विशेष न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर मंगळवारी ईडीच्या तीन अधिकाऱ्यांनी येरवडा कारागृहात जाऊन डीएसके यांची चौकशी सुरू केली. तिघांची चौकशी ३० जुलैपर्यंत चालणार असून त्यानंतर लेखापरीक्षक सुनील घाटपांडे यांची चौकशी करण्यात येणार आहे.ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांना आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केल्यानंतर सध्या ते न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत. डी. एस. कुलकर्णी यांनी केलेल्या फसवणुकीचा प्रकार गंभीर असल्याने त्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार आणि सक्तवसुली संचालनालयाला कळविली. त्यानुसार त्यांनी माहिती घेऊन यापूर्वीच चौकशी सुरू केली आहे.या गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने कंपनी गैरव्यवहार अफरातफरी प्रकरणात केंद्र सरकारच्या सिरियस फॉड इन्व्हेटिगेशन डिपार्टमेंटने यापूर्वी डी. एस. कुलकर्णी यांची चौकशी केली आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या वतीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. आता त्यांना प्रत्यक्ष चौकशी करायची आहे. त्यासाठी सक्तवसुली संचालयनालयाचे अधिकारी अजित काटकर, प्रवीण साळुंखे सहका-यांसह पुण्यात आले आहे. त्यांनी शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांच्या न्यायालयात ईडीच्या वतीने अर्ज करण्यात आला होता. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने डीएसके यांनी पैशाचा विनियोग कशा पद्धतीने केला याची चौकशी करण्याची गरज असल्याने परवानगी द्यावी, असे या अर्जात म्हटले होते. न्यायालयाने त्यांना २४ ते ३० जुलै दरम्यान कारागृहात जाऊन चौकशी करण्यास परवानगी दिली. लेखापरीक्षक सुनील घाटपांडे यांचीही चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. त्यावर पुणे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले की, न्यायालय सुनील घाटपांडे यांच्या जामीन अर्जावर २६ जुलैला निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांची चौकशी ३० जुलैनंतर करण्यात यावी, असे सांगण्यात आले. ईडीचे अधिकारी मंगळवारी येरवडा कारागृहात गेले. त्यांनी न्यायालयाचा आदेश दाखवून डी. एस. कुलकर्णी यांच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी